शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अन्नधान्य महागणार; एपीएमसीच्या वाहतूकदारांकडून पाच वर्षांनंतर भाडेवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 06:49 IST

एपीएमसीमधील वाहतूकदारांचा निर्णय; खर्च वाढल्यामुळे पाच वर्षांनंतर भाडेवाढ

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या धान्य व मसाला मार्केटमधील रिटेल ट्रान्सपोर्ट ओनर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबई या संघटनेने १ जानेवारीपासून भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच वर्षांमध्ये वाहनांच्या किमती, इंधन व इतर खर्चामध्येही वाढ होत असल्यामुळे १० ते २० टक्के भाडेवाढ करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.एपीएमसीच्या धान्य व मसाला मार्केटमधील सर्वात जुनी व मोठी वाहतूकदार संघटना म्हणून रिटेल ट्रान्सपोर्ट ओनर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबईची ओळख आहे. दोन्ही मार्केटमध्ये ६०० पेक्षा जास्त वाहतूकदार या संघटनेचे सभासद आहे. धान्य व मसाल्याचे पदार्थ मार्केटमधून मुंबई, नवी मुंबई परिसरामध्ये पोहोचविण्याचे काम हे वाहतूकदार करत आहेत. पाच वर्षांपासून वाहतुकीच्या दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, परंतु या वर्षामध्ये १० लाख रुपयांच्या गाडीचे दर १७ ते १८ लाख रुपये झाले आहेत. इंधनाच्या दरामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. खर्चामध्ये वाढ झाली असल्यामुळे जुन्या दरामध्ये मालाची वाहतूक करणे शक्य होत नाही. यामुळे १ जानेवारीपासून मालवाहतुकीच्या दरामध्ये १० ते २० टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर पवार व सचिव अब्दुल शेख यांनी याविषयी निवेदन प्रसिद्ध केले आहे. वाहतूकदारांचा तोटा वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रमुख संघटनेने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता इतर संघटना काय निर्णय घेणार याकडे बाजारसमितीमधील इतर घटकांकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती