शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या मालमत्ता हस्तांतर शुल्कात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:49 IST

संचालक मंडळाचा निर्णय : छोट्या भूखंडांना दिलासा, १ एप्रिलपासून सुधारित दर

नवी मुंबई : सिडकोने आपल्या मालमत्तांच्या हस्तांतर शुल्कात वाढ केली आहे. यात लहान आकाराच्या भूखंडांना दिलासा देण्यात आला आहे. तर मोठ्या आकाराच्या सदनिका, दुकाने, कार्यालये आणि व्यावसायिक गाळ्यांच्या हस्तांतर शुल्कात दहा टक्के वाढ करण्यात आली आहे.

नवी मुंबईतील सर्व मालमत्ता सिडकोच्या मालकीच्या आहेत. विविध प्रयोजनासाठी सिडकोने त्या ६० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिल्या आहेत, त्यामुळे या मालमत्ता विकताना सिडको संबंधितांकडून हस्तांतर शुल्क आकारते. या वर्षी सिडकोने हस्तांतर शुल्कात दहा टक्के वाढ सूचित केली आहे. ३१० चौरस फुटांवरील सदनिका, आॅफिस, दुकाने, गोदाम, मोकळे भूखंड आदींना लागू असणार आहे, तर २१० ते ३०० चौरस फुटांपर्यंतच्या एस.एस.टाइपच्या छोट्या युनिटसाठी केवळ पाच टक्के शुल्क वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईसह उरण व पनवेल तालुक्यात छोट्या सदनिकाधारकांना काही प्रमाणात दिलासा देण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हस्तांतर शुल्काच्या नवीन दरआकारणीस मंजुरी देण्यात आली आहे. १ एप्रिल २०१९ ते २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी हे दर असणार आहेत. विशेष म्हणजे, सिडकोच्या विकसित नोडच्या तुलनेत उलवे तथा द्रोणागिरी या अविकसित नोडमधील हस्तांतर शुल्क कमी ठेवण्यात आले आहेत. तसेच निवासी तथा वाणिज्यिक व केवळ वाणिज्यिक वापरासाठी वाटप करण्यात आलेल्या भूखंडांच्या हस्तांतरासाठी शुल्क आकारणीची सुधारित रचना करण्यात आली आहे.सध्या २०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिकांसाठी १९,६४५ रुपये हस्तांतर शुल्क भरावे लागते. यात पाच टक्के वाढ केल्याने १ एप्रिलपासून २०,७९० रुपये हस्तांतर शुल्क भरावे लागणार आहे. त्याचप्रमाणे २१० ते ३०० चौरस फूट क्षेत्रफळासाठी सध्या ३०,५५५ इतके शुल्क भरावे लागते. सुधारित शुल्क रचनेनुसार आता ३२,०१० रुपये हस्तांतर शुल्क भरावे लागणार आहे.

टॅग्स :cidcoसिडको