शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मोडक्या खेळण्यांमुळे मुलांसाठी उद्याने गैरसोयीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:56 IST

तुटलेल्या साहित्यांमुळे अपघाताची शक्यता; सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी

नवी मुंबई : पालिकेने विकसित केलेल्या उद्यानांमधील खेळण्यांची डागडुजीअभावी मोडतोड झालेली आहे. यामुळे त्या ठिकाणी खेळण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांना दुखापत होण्याची शक्यता निर्माण होत आहे. अशा मोडक्या खेळण्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येत आहे.पालिकेने प्रत्येक नोडमध्ये विकसित केलेल्या छोट्या-मोठ्या उद्यानांमुळे उद्यानांचे शहर म्हणून देखील नवी मुंबईची ओळख होते. त्यापैकी अनेक उद्यानात लहान मुलांच्या विरंगुळ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची खेळणी बसवण्यात आली आहेत. यामुळे दररोज सकाळ-संध्याकाळ त्याठिकाणी लहान मुलांची खेळासाठी गर्दी जमलेली असते; परंतु डागडुजीअभावी बहुतांश ठिकाणच्या उद्यानातील खेळण्यांची मोडतोड झालेली आहे. त्यामुळे मोडलेल्या खेळण्यांच्या धातूचे भाग चोरीला गेल्याचेही पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी घसरगुंडीच्या वरच्या टोकावर मुलांच्या सुरक्षेसाठी असलेले भाग तुटलेले आहेत, तर झोके एका बाजूला झुकले आहेत.उद्यानांमधील लहान मुलांसाठी असलेल्या या खेळण्यांचा वापर बहुतेक वेळा काही टवाळ मुलांकडून मस्ती करण्यासाठी होत आहे. यामुळेही खेळण्यांची मोडतोड होत असल्याचाही पालकांचा आरोप आहे. यामुळे प्रत्येक उद्यानांमध्ये सुरक्षारक्षक नेमण्याचीही मागणी होत आहे; परंतु प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने बहुतांश उद्यानातील मोडकी खेळणी जशीच्या तशी आहेत. लहान मुलांकडून त्यांचा वापर खेळण्यासाठी होत असल्याने एखाद्यास दुखापत होण्याची देखील शक्यता निर्माण होत आहे. याचे गांभीर्य स्थानिक लोकप्रतिनिधींसह पालिका अधिकारीदेखील घेत नसल्याचाही संताप पालकांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई