शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

नवी मुंबईत कोरोना काळात झाले श्वानदंशाचे प्रमाण गतवर्षीपेक्षा निम्मे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 02:08 IST

Navi Mumbai News : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून शहरात श्वानदंशाचे प्रमाणही घटले आहे. डिसेंबरपर्यंत ४,८८३ जणांना श्वान दंश झाला असून, हे प्रमाण गतवर्षीपेक्षा निम्मे आहे. सहा वर्षांत जवळपास ७० हजार नागरिकांवर श्वानांनी हल्ला केल्याची नोंद झाली आहे.

- नामदेव मोरे नवी मुंबई -  कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून शहरात श्वानदंशाचे प्रमाणही घटले आहे. डिसेंबरपर्यंत ४,८८३ जणांना श्वान दंश झाला असून, हे प्रमाण गतवर्षीपेक्षा निम्मे आहे. सहा वर्षांत जवळपास ७० हजार नागरिकांवर श्वानांनी हल्ला केल्याची नोंद झाली आहे.मुंबई, ठाणे प्रमाणे नवी मुंबईमधील नागरिकांनाही भटक्या श्वानांच्या उपद्रवास सामोरे जावे लागत आहे. महानगरपालिकेने श्वान नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवून निर्बीजीकरण शस्त्रक्रिया वाढविल्या आहेत. यामुळे भटक्या श्वानांची वाढ रोखण्यात यश आले असले तरी श्वानदंशाच्या घटना कमी होत नव्हत्या. प्रत्येक वर्षी दहा हजारांपेक्षा जास्त नागरिकांना श्वानांनी चावल्याची नोंद होत असते. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून श्वानदंशाचे प्रमाणही कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. डिसेंबरपर्यंत ४८८३ नागरिकांना श्वानदंश झाल्याची नोंद झाली आहे. गतवर्षी ही संख्या १०४८२ होती. एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू झाला. नागरिकांच्या घराबाहेर पडण्यावरही निर्बंध आले होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही रात्रीच्या फिरण्यावर निर्बंध कायम राहिले आहेत. यामुळे श्वान चावल्याच्या घटना कमी झाल्याचे बोलले जात आहे.सहा वर्षांत ७० हजार जणांना श्वानांनी चावले आहे. सर्वाधिक १४५५६ घटना २०१६ - १७ या वर्षात झाल्या आहेत. २५ हजार श्वानांचे निर्बीजीकरणमहानगरपालिकेने २०१४ पासून आतापर्यंत तब्बल २५१३१ श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली आहे. २२३९७ जणांवर उपचार केले आहेत. निर्बीजीकरण व उपचारावर सहा वर्षांत ७ कोटी ६६ लाख ५९ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. शहरातील जवळपास ९० टक्के श्वानांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया झाली आहे. वर्षनिहाय  घटना पुढीलप्रमाणेवर्ष    श्वानदंश२०१५ - १६    १३,९२१२०१६ - १७    १४,५४६२०१७ - १८    १३,७८३२०१८ - १९    १२,२९५२०१९ - २०    १०,४८२२०२० - २१    ४,८८३ अनेक रुग्ण मानखुर्द, गोवंडीचेश्वान दंशाच्या घटनांमध्ये अनेक रुग्ण हे मानखुर्द, गोवंडी व इतर ठिकाणचे असल्याचेही निदर्शनास आले आहे. मनपा बाहेरचे रुग्णही उपचारासाठी येथे येतात. यामुळे पालिका प्रशासनाने श्वान दंशाच्या शहरातील घटना किती व शहराबाहेरील किती याची माहिती तपासण्यासही सुरुवात केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईdogकुत्रा