शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

देशात दोन लाख पाणथळींसह ८० हजार सरोवरे धोक्यात; पर्यावरणप्रेमींचे पंतप्रधानांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 06:28 IST

भूमाफियांकडून बुजविली जाण्याची भीती

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत सरोवर प्रकल्पाचे कौतुक करत नॅशनल वेटलँड्स ॲटलासने सूचित केलेल्या दोन लाखांहून अधिक पाणथळ जागांसह सुमारे ८० हजार अमृत सरोवरांना पाणथळ जागा म्हणून अधिसूचित करावे, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे ही सरोवरे धोक्यात असून भूमाफियांकडून बुजविली जाण्याची भीती आहे.

ॲटलासने ओळखलेल्या पाणथळ जागांची यादी करून आणि त्यानंतर अधिसूचित करण्याबाबत स्पष्टता नसल्याने एवढा संभ्रम निर्माण झाला आहे की, बेशिस्त नागरी विकासामुळे देश मौल्यवान जलस्रोत गमावत आहे, याकडे ग्रीन ग्रुपने लक्ष वेधले आहे. इस्रोच्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटरने तयार केलेल्या यादी प्रमाणे ७.५७ लाख पाणथळ क्षेत्रांपैकी केवळ १२५५ पाणथळ जागा अधिसूचित केल्या आहेत, असे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान नियंत्रण मंत्रालयाने प्रायोजित केलेल्या इंडियन वेटलँड्स वेबसाइटवरून स्पष्ट होत आहे.

या ७.५७ लाख पाणथळ क्षेत्रांपैकी दोन लाखांहून अधिक पाणथळी २.२५ हेक्टरपेक्षा मोठ्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांचे संरक्षण केले पाहिजे. सामाजिक कार्यकर्ते नरेशचंद्र सिंह यांनी या सरोवरांना पाणथळ जागांचा दर्जा देऊन त्यांना केंद्र व राज्य पाणथळ प्राधिकरणाच्या अखत्यारीत आणले पाहिजे. तर नंदकुमार पवार यांनी सुविधांच्या नावाखाली उरणमधील पाणथळी गमावल्या असल्याचा आरोप केला.

नामशेष होण्याचा जास्त धोका या पाणथळींच्या संरक्षणाबाबत प्रगती नसल्याने नॅटकनेक्ट फाउंडेशनने पंतप्रधानांना पत्राद्वारे यातील ८० हजार अमृत सरोवरांना पाणथळ जागा म्हणून अधिसूचित न केल्यास ते बुजविले जाऊन नामशेष होण्याचा धोका आहे. सरकारने अलीकडेच पाण्याचे स्रोत, पूर आणि वादळ प्रत्यारोधी (बफर्स), पाणी शुद्ध करणारे, मनोरंजन आणि पर्यटन स्थळे, निसर्ग-समाज परस्परसंवाद, कार्बन सिंक, स्थलांतरित पक्ष्यांसाठी अधिवास आणि जैवविविधतेचे हॉटस्पॉट्स यावर बहुआयामी अभ्यासासाठी उपयुक्त ठिकाणे आहेत.

२००६-०७ च्या वेटलँड ॲटलास आणि २०१६-१७ च्या दशकीय बदल ॲटलासनुसार पाणथळींची यादी अधिसूचित करण्यात विलंब झाल्याकडे आम्ही लक्ष वेधले आहे. पंतप्रधानांच्या वेबसाइटवर नॅटकनेक्टच्या याचिकेवर प्रक्रिया सुरू आहे. एमओईएफसीसीमधील राजशेखर रत्ती (वैज्ञानिक डी) यांच्याकडे ती पाठविली आहे. - बी. एन. कुमार, नॅटकनेक्टचे संचालक

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी