शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत तूरडाळीचे दर झाले दुप्पट, गहू, ज्वारी, बाजरीही आली तेजीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 06:48 IST

देशभरात मागील पाच वर्षांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : देशभरात मागील पाच वर्षांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतीमध्ये जवळपास  दुप्पट वाढ झाली आहे. तूर डाळीचे दरही पाच वर्षात ४३ ते ६५ रुपये किलोवरून ९५ ते १३५ रुपये किलो झाले आहेत.डाळी व कडधान्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असल्यामुळे चणा डाळ वगळता इतर सर्वच डाळींच्या दरामध्ये विक्रमी वाढ झाली  आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सद्यस्थितीमध्ये सरासरी ४ हजार टन अन्नधान्य, डाळी, कडधान्याची आवक होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून कृषी माल येथे विक्रीला येत आहे. पाच वर्षांपासून अन्नधान्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पाच वर्षांपूर्वी १८ ते २२ रुपये किलो दराने विकली जाणारी ज्वारी होलसेल मार्केटमध्ये २६ ते ४३ रुपये दराने विकली जात आहे. 

गहू १९ ते २२ वरून २६ ते ४२, लोकवन गहू २१ ते २५ वरून २७ ते ४० रुपये दराने विकला जात आहे. साधा तांदूळ २१ ते २७ वरून ३२ ते ४८ रुपयांवर पोहोचला आहे.

डाळी कडधान्याच्या दरामध्ये विक्रमी वाढ झाली आहे. मूग डाळ ५६ ते ६२ वरून ९० ते १३० रुपये किलोवर पोहोचली आहे. मसूर डाळ ३९ ते ४६ वरून ७० ते ८० रुपये किलो झाली आहे. यावर्षी जीवनावश्यक वस्तूंचे दर तेजीत राहण्याची शक्यता आहे.

होलसेलचे बाजारभाव

    २०१७    २०२३बाजरी    १८ ते २२    २६ ते ४३गहू    १९ ते २२    २६ ते ४२लोकवन गहू    २१ ते २५    २७ ते ४०ज्वारी    १८ ते २८    २८ ते ५५तांदूळ    २१ ते २७    ३२ ते ४८हरभरा डाळ    ६६ ते ७१    ५८ ते ६८मसूर    ४१ ते ४५    ६३ ते ७८मसूर डाळ    ३९ ते ४६    ७० ते ८०उडीद डाळ    ६० ते ७९    ९० ते ११२मूग    ५५ ते ७२    ८५ ते १२५मूग डाळ    ५६ ते ६२    ९० ते १३०तूर डाळ    ४३ ते ६५    ९५ ते १३५

डाळी, कडधान्याचा देशात तुटवडा आहे. देशात पुरेसे उत्पादन झालेले नाही. आयातही कमी होत आहे. यावर्षी पेरण्या वेळेत झालेल्या नाहीत. यामुळे अन्नधान्य, डाळींचे दर तेजीत राहतील. - नीलेश वीरा, संचालक, धान्य मार्केट, मुंबई बाजार समिती

टॅग्स :Mumbaiमुंबई