शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीत पूर्वीपेक्षा दुपटीने अडवली मार्जिनल स्पेस; पदपथांवरही अतिक्रमण सुरू, नगरविक संतप्त

By नारायण जाधव | Updated: November 3, 2023 15:40 IST

यामुळे अनधिकृत बांधकाम करणारे व्यावसायिक आणि अतिक्रमण करणारे व्यापारी यांना अभय देणाऱ्या सीएमओ अर्थात नगरविकास मंत्रालयाविरोधात नवी मुंबईकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने गेल्या आठवड्यात एपीएमसीत व्यापाऱ्यांनी केलेली अतिक्रमणे तोडून त्यांना दंड ठोठावला होता. मात्र, यास व्यापाऱ्यांनी विरोध केल्यानंतर अतिक्रमण काढणारे उपायुक्त राहुल गेठे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. ही बदली होताच अनेक व्यापाऱ्यांनी आता पूर्वीपेक्षा दुपटीने मार्जिन स्पेसच नव्हे, तर समोरील पदपथांवरही अतिक्रमण करणे सुरू केले आहे. यामुळे अनधिकृत बांधकाम करणारे व्यावसायिक आणि अतिक्रमण करणारे व्यापारी यांना अभय देणाऱ्या सीएमओ अर्थात नगरविकास मंत्रालयाविरोधात नवी मुंबईकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

बुधवारी गेठे यांची बदली होताच गुुरुवारपासूनच व्यापाऱ्यांनी दिवाळीचे कारण पुढे करून शेड टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी बांबू बांधण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, ते करताना पूर्वीपेक्षा दुप्पट मार्जिनल स्पेसवर काबीज केले आहे. एवढेच समोरील पदपथावर सामान ठेवण्यास सुरुवात केल्याचे एपीएमसीतील मर्चंट चेंबर इमारतीच्या परिसरात दिसले. यासाठी व्यापाऱ्यांनी महापालिकेची परवानगी घेतली आहे काय, अशी विचारणा ‘लोकमत’ने नवी मुंबई महापालिकेचे तुर्भे विभाग अधिकारी भरत धांडे यांना छायाचित्रासह मेसेज पाठवून केली असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.अपघाताची शक्यता -एपीएमसी परिसर नेहमीच गजबजलेला असतो. आता दिवाळी जवळ आल्याने परिसरात खरेदीसाठी महामुंबईतील ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. यामुळे दुकानांसमोर वाहनांची गर्दी होत आहे. त्यातच अनेकांनी पदपथ काबीज केल्याने ग्राहकांसह पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाही नाही. यामुळे रस्त्यावरून येजा करतांना अपघाताची शक्यता बळावली आहे.एपीएमसीसह वाहतूक पोलिसांचे दुर्लक्षपरिसरात अनेकांनी अतिक्रमण केले आहे. त्याकडे एपीएमसी प्रशासनाने कानाडोळा केला आहे. तसेच पदपथांवर व्यापारी सामान ठेवत असून, अनेकजण दुचाकीही पदपथांवर उभ्या करीत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणNavi Mumbaiनवी मुंबई