शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध प्रवासी वाहतुकीचे पेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:00 IST

प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर; आरटीओ, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

नवी मुंबई : शहरातील नागरिकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने शहरातील तसेच शहराबाहेरील विविध भागात एनएमएमटी बस सुरू केल्या आहेत; परंतु या मार्गावर बस फेऱ्यांची कमतरता असल्याने अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.नवी मुंबईतील नागरिकांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्र माची सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांना शहराबरोबर शेजारील कल्याण-डोंबिवली, उरण, मुंबई, पनवेल, ठाणे, मुंब्रा आदी शहरातदेखील मोठ्या प्रमाणावर जाळे पसरविले आहे; परंतु अनेक मार्गांवर बसची संख्या आणि बस फेºया कमी असल्याने टाटा मॅजिक, इको, सुमो आदी खासगी वाहनांमधून नेरुळ रेल्वेस्थानक, जुईनगर रेल्वेस्थानक, सानपाडा, महापे, खारघर, कल्याण, डोंबिवली, वाशी, पनवेल आदी भागात मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक केली जात आहे. अवैध वाहतूक करणाºया वाहनांमध्ये वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासीवाहतूक केली जात असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दादेखील ऐरणीवर आला आहे. उरण-जेएनपीटी भागात दररोज प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, जुईनगर रेल्वेस्थानकापासून कोप्रोलीपर्यंत एनएमएमटीची ३४ क्र मांकाची बस धावते. या मार्गावर एनएमएमटीच्या १२ बस धावत असून, दिवसाला सुमारे ८० फेºया पूर्ण केल्या जात आहेत; परंतु या फेºयाही अपूर्ण पडत असल्याने तसेच प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्याची घाई असल्याने प्रवासी खासगी वाहनांनी प्रवास करीत आहेत. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने अवैध प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांची संख्या वाढल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकNavi Mumbaiनवी मुंबई