शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामांचा धडाका

By admin | Updated: June 21, 2016 01:38 IST

सानपाडा परिसरात अनधिकृत बांधकामांचा धडाका सुरू आहे. फिफ्टी फिफ्टीची बांधकामे सर्रासपणे सुरू आहेत. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी तक्रारी करूनही त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात आहे

नवी मुंबई : सानपाडा परिसरात अनधिकृत बांधकामांचा धडाका सुरू आहे. फिफ्टी फिफ्टीची बांधकामे सर्रासपणे सुरू आहेत. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी तक्रारी करूनही त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात आहे. अनेकदा भूमाफियांना पूरक ठरेल अशीच भूमिका सिडकोच्या संबंधित विभागाकडून घेतली जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.सानपाडा गावात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. येथील सेक्टर ५ मध्ये अलीकडेच एका सहा मजली इमारतीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही इमारत सिडको संपादित जमिनीवर उभारण्यात आली आहे. या इमारतीचे बांधकाम सुरू असताना २२ जुलै २0१५ मध्ये यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये सविस्तर वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. तसेच स्थानिक रहिवासी एकनाथ गंगाराम दळवी यांनी या बांधकामाच्या विरोधात विविध स्तरावर तक्रार अर्ज सादर केले आहेत. या तक्रारीची दखल घेत १३ एप्रिल २0१५ रोजी या बांधकामाला सिडकोच्या संबंधित विभागाने नोटीस बजावली. याव्यतिरिक्त आतापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याचा परिणाम म्हणून गेल्या वर्षभरात या जागेवर सहा मजल्यांची सुसज्ज अशी बेकायदा इमारत उभारण्यात आली आहे. सिडकोच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईला बगल देत हेतूपुरस्सर या इमारतीच्या उभारणीला चालना दिल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे. दरम्यान, ६ जून २0१६ रोजी सिडकोच्या संबंधित विभागाने या इमारतीवर कारवाई नियोजित केली होती. परंतु पोलीस बंदोबस्ताचे कारण पुढे करीत ही नियोजित कारवाई संध्याकाळपर्यंत रोखून धरण्यात आली. याच दरम्यान, संबंधित बांधकामधारकाने संध्याकाळी या कारवाईला न्यायालयातून स्थगिती मिळविली. एकूणच सिडकोच्या यासंदर्भातील भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. एकीकडे नोटीस बजावायची आणि दुसरीकडे कारवाई टाळण्यासाठी पळवाटा दाखवायच्या या सिडकोच्या कार्यपध्दतीमुळे अनधिकृत बांधकामांना चालना मिळत असल्याचा आरोप होत आहे. (प्रतिनिधी)१0२४ प्रकरणांत सिडकोचे कॅव्हेटबेकायदा बांधकामांवरील कारवाईदरम्यान न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा अनधिकृत बांधकामांना यापुढे न्यायालयाकडून स्थगिती मिळू नये, यासाठी १0२४ प्रकरणांत कॅव्हेट दाखल केल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही वस्तुस्थिती असताना सानपाड्यातील त्या इमारतीला स्थगिती मिळालीच कशी, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.