शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

प्रसाधनगृहांच्या देखभालीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: January 6, 2017 05:53 IST

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरातील जुन्या शौचालयांची दुरुस्ती व नवीन शौचालयांची निर्मिती करण्याचे काम वेगाने सुरू आहे; पण सुरू असलेल्या शौचालयांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरातील जुन्या शौचालयांची दुरुस्ती व नवीन शौचालयांची निर्मिती करण्याचे काम वेगाने सुरू आहे; पण सुरू असलेल्या शौचालयांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जात आहे. ठेकेदाराकडून नागरिकांची जादा पैशांसाठी अडवणूक सुरू असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही.स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने हागणदारीमुक्त नवी मुंबई करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कारवाईदरम्यान नागरिकांनी परिसरात प्रसाधनगृहच नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर नवीन प्रसाधनगृह उभारणी व जुन्या प्रसाधनगृहांची दुरुस्ती करण्याचे काम वेगाने सुरू आहे. जुन्या शौचालयांची दुरुस्ती व रंगरंगोटी केली जात असून पहिल्यांदाच प्रसाधनगृह बाहेरून स्वच्छ व सुंदर दिसू लागली आहेत; पण या प्रसाधनगृहांची देखभाल करण्यासाठी व संबंधित ठेकेदार नियमाप्रमाणे कार्यवाही करतात की नाही, याकडे लक्ष देणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही. ठेकेदारांवर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. शहरातील प्रसाधनगृहांमध्ये गांजा विक्री होत असल्याचेही यापूर्वी निदर्शनास आले आहे. शौचास जाण्यासाठी नागरिकांकडून ५ रुपये शुल्क आकारले जात आहे. काही ठिकाणी दोन रुपये, तर काही ठिकाणी १ रुपया शुल्क घेतले जात आहे. प्रसाधनगृहांची योग्य प्रकारे स्वच्छता ठेवली जात नाही. नागरिकांसाठी तक्रारवही ठेवली जात नाही. सद्यस्थितीमध्ये ठेकेदाराचा व पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे नंबर दिले आहेत; पण त्याचाही फारसा उपयोग होत नाही. स्वच्छ भारत अभियानामध्ये प्रथम क्रमांक मिळावा, यासाठी प्रशासनाची धडपड सुरू असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. स्वच्छतागृहांना रंगरंगोटी केली असल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे; पण यापेक्षा येथील व्यवस्थापनाला शिस्त लावण्यात यावी व शुल्क आकारणीविषयी स्पष्टता असावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अनेक ठिकाणी ठेकेदाराने नियुक्त केलेले कर्मचारी चुकीचे काम करत आहे. त्यांच्या मर्जीप्रमाणे प्रसाधनगृह उघडले जाते व बंद केले जाते. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून दिखावेगिरी थांबविण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. अनेक ठिकाणी शौचालयांच्या बाहेर चांगले पोस्टर्स लावले आहेत; पण प्रत्यक्षात प्रसाधनगृह वापरण्यायोग्य नाही, यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)