शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांत अग्निशमनच्या वापराविषयी अज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 01:18 IST

जीवितहानीचा धोका : १० टक्के रुग्णालयांचे फायर ऑडिट नाहीच

सूर्यकांत वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरातील १० टक्क्यांहून अधिक रुग्णालयांचे अद्यापही फायर ऑडिट झालेले नसल्याचे समोर येत आहे. तर ज्या रुग्णालयांमध्ये यंत्रणा कार्यान्वित आहे, तिथल्या कर्मचाऱ्यांना तिच्या वापराविषयी अज्ञानता असल्याचेही दिसून येत आहे. परिणामी वसईसारखी दुर्घटना घडल्यास यंत्रणा असूनही ती वापरता न आल्यानेही मोठी जीवितहानी घडू शकते.

वसई व नाशिक येथील कोविड रुग्णालयांमध्ये घडलेल्या दुर्घटनेमुळे राज्यभरातील रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अशा दुर्घटनेची पुनरावृत्ती नवी मुंबईत घडू नये यासाठी महापालिकेने हालचालींना वेग दिला आहे.दहा दिवसांपूर्वीच ऐरोली येथील कोविड सेंटरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली होती. सुदैवाने तिथल्या कर्मचाऱ्याने आगीवर नियंत्रण मिळवल्याने संभाव्य दुर्घटना टळली. मात्र इतरही रुग्णालयांमध्ये अशा घटना घडू नयेत, अथवा घडल्यास त्यावर वेळीच नियंत्रण मिळवता यावे यासाठी महापालिकेने उपाययोजनांना सुरुवात केली आहे. मात्र अग्निशमन विभागामार्फत दोन महिन्यांपूर्वीच शहरातील सर्वच रुग्णालयांची पाहणी केली होती. या वेळी १७३ खासगी रुग्णालयांपैकी ९ रुग्णालयांनी फायर ऑडिट केलेच नसल्याचे समोर आले होते. त्यापैकी काही रुग्णालयांना अनेकदा नोटीसदेखील बजावण्यात आलेली आहे, परंतु प्रशासनाकडून नोटीसव्यतिरिक्त काही ठोस कारवाई होत नाही. याचा गैरफायदा या रुग्णालयांकडून घेतला जात असल्याने फायर ऑडिटकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

  काही रुग्णालयांत दाटीने रुग्णांची व्यवस्था करून केवळ नफा कमवण्याच्या उद्देशाने चालवली जात आहेत. त्यापैकी काही रुग्णालयांत प्रवेश करताना रुग्णालादेखील अंग आखडते घ्यावे लागत आहे. परिणामी अशा रुग्णालयांमध्ये एखादी छोटीशी दुर्घटना मोठ्या जीवितहानीला कारणीभूत ठरू शकते.अशातच ज्या रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित आहे, तिथल्या कर्मचाऱ्यांना ती वापरायची कशी याबाबत ज्ञानच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मोठमोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा हाताळण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्याच्या सूचनादेखील पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून करण्यात आल्या आहेत. त्याकडेही दुर्लक्ष होत असल्याने आपत्कालीन प्रसंगी तिथली अग्निशमन यंत्रणा असूनही निरुपयोगी ठरू शकते.सर्व रुग्णालयांची चाचपणीशहरातील सर्वच रुग्णालयांची नव्याने चाचपणी करून तिथल्या अग्निशमन यंत्रणेचा आढावा घेतला जाणार आहे. यासाठी आयुक्तांच्या निर्देशानुसार पाच पथके तयार करण्यात आली आहेत. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पाहणीत काही रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळल्या होत्या. त्यांनी अद्याप सुधार केला नसल्यास कारवाईचा इशारा दिला जाणार आहे.

अडचणीच्या जागेतही रुग्णालयेनवी मुंबईत १७३ हून अधिक खासगी रुग्णालये आहेत. तर पालिकेचे सहा कोविड सेंटर व पालिकेच्या परवानगीने चालवले जात असणारे सुमारे ५० कोविड सेंटर आहेत. बहुतांश खासगी रुग्णालये स्वतंत्र जागेऐवजी रो हाउस, गळ्यात    चालवली जात आहेत. त्या ठिकाणी जरी अग्निशमन यंत्रणा असली, तरीही अडचणीच्या जागेमुळे आपत्कालीन प्रसंगी दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकते.

रुग्णालयांचे फायर ऑडिट अग्निशमन विभागाचे प्रमुख शिरीष आरदवाड यांच्याकडे, ऑक्सिजन ऑडिट उपायुक्त बाबासाहेब राजळे यांच्याकडे तर स्ट्रक्चर ऑडिट शहर अभियंता संजय देसाई यांच्यामार्फत होणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नेमलेली पथके येत्या चार दिवसांत सर्वच रुग्णालयांची पाहणी करून आढावा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे सादर करणार आहेत.

टॅग्स :fireआग