शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मतदारयादीनंतर ओळखपत्रांचाही घोळ; प्रशासकीय दिरंगाईविषयी नागरिकांनी व्यक्त केला संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:53 IST

मतदारयादीप्रमाणे ओळखपत्र वाटपामध्येही घोळ सुरू झाला आहे. ओळखपत्र वाटप वेळेमध्ये केले जात नाही. कार्यालयामध्ये फेरी मारूनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

- वैभव गायकरपनवेल : मतदारयादीप्रमाणे ओळखपत्र वाटपामध्येही घोळ सुरू झाला आहे. ओळखपत्र वाटप वेळेमध्ये केले जात नाही. कार्यालयामध्ये फेरी मारूनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीपर्यंत ओळखपत्र मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.प्रशासकीय स्तरावर अनेक महिन्यांपासून नवीन मतदार, मतदारांचा पत्ता बदल, ठिकाण बदल आदी दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे. पनवेलमधील नागरिकांनी मतदानयादीमधील नावामधील व इतर त्रुटी सुधारण्यासाठी अर्ज केले होते. अनेकांनी नवीन नोंदणीचे अर्ज भरले होते. तब्बल १७ हजारांपेक्षा जास्त मतदारांचे ओळखपत्र नव्याने निवडणूक आयोगाने तयार करून ते निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत तलाठी, कोतवाल यांच्याकडे वाटपासाठी देण्यात आलेले आहेत. तलाठी कार्यालयामार्फत शहरनिहाय मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे संबंधित मतदार ओळखपत्र वाटपाचे काम दिले आहे. याकरिता विविध शाळेतील शिक्षकांची बीएलओ म्हणून निवड करण्यात आली आहे. जवळ जवळ १०० बीएलओ याकरिता नेमले आहेत. त्यांच्याकडे मतदारांची ओळखपत्र वाटपासाठी देण्यात आली आहेत. मतदारांना या संपूर्ण प्रक्रि येबद्दल काहीच माहिती नसल्याने मतदार ओळखपत्रासाठी तहसील कार्यालय, तलाठी कार्यालयात खेटे मारत आहेत. तहसील कार्यालयात एका भिंतीवर लावलेल्या यादीत बीएलओचे दूरध्वनी क्र मांक लावण्यात आले आहेत. याच यादीमध्ये मतदार यादी क्रमांकाद्वारे संबंधित नेमलेल्या बीएलओशी संपर्क साधून आपले मतदार ओळखपत्र प्राप्त करावे, अशा सूचना या ठिकाणी दिल्या जातात. मात्र, सर्व प्रकाराची खातरजमा करूनदेखील मतदारांना ओळखपत्र प्राप्त होत नसल्याने अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.सध्याच्या घडीला पनवेल तालुक्यात एकूण १७ हजारांच्या आसपास नवीन ओळखपत्रांचे स्मार्ट कार्ड आलेले आहेत. हे ओळखपत्र वाटपासाठी बीएलओकडेही दिलेले आहेत. मात्र, प्रत्यक्ष मतदारांना ओळखपत्र मिळण्यास विलंब लागत आहे.निवडणूक आयोगामार्फत मतदारयादींमध्ये नाव नोंदणी तसेच दुरु स्तीचे आवाहन वेळोवेळी करण्यात येत असते. या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिक या प्रक्रि येमध्ये सहभाग घेत असतात. मात्र, नावनोंदणी करूनदेखील प्रत्यक्ष मतदार यादींमध्ये नावनोंदणी, निवडणूक ओळखपत्र मिळण्यास विलंब लागत असल्याने अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.मतदानापूर्वी ओळखपत्र मिळावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.ओळखपत्र कधी मिळणारपनवेलमध्ये निवडणूक आयोगामार्फत नव्याने मतदार नोंदणी, तसेच नाव-पत्ता दुरु स्ती केलेल्या मतदारांची जवळ जवळ १७ हजार ओळखपत्र आलेली आहेत. तलाठी यांच्याद्वारे संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे मतदारांना वाटपासाठी देण्यात आलेले आहेत. संबंधित बीएलओंची यादीदेखील तहसील कार्यालयात लावण्यात आलेली आहे. मात्र, मतदार ओळखपत्र वाटपाची प्रक्रि या अद्याप सुरू झाली नाही.नवी मुंबईमध्येही गोंधळनवी मुंबईमध्येही अनेकांना मतदान ओळखपत्र मिळालेली नाहीत. कर्मचारी ओळखपत्र घेऊन मतदारांचा पत्ता शोधत फिरत आहेत; पण अनेकांचे पत्ते चुकीचे लिहिले आहेत. मंगळवारी वाशीमध्ये ओळखपत्र घेऊन फिरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी सेक्टर १७ मध्ये नागरिकांना हा पत्ता कुठे आहे, अशी विचारणा करण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये ओळखपत्र बी टाइप इमारतीमधील होती व पत्ता सेक्टर १७ असा लिहिण्यात आला होता, यामुळे दोन तास फिरूनही पत्ता शोधता आला नव्हता.नव्याने १७ हजार ओळखपत्र आलेली आहेत. तलाठीमार्फत बीएलओकडे मतदार ओळखपत्र वाटपासाठी देण्यात आलेली आहेत. लवकरच सर्व मतदारांना ती ओळखपत्र प्राप्त होतील. ओळखपत्र स्मार्ट कार्ड स्वरूपात असल्याने सर्व मतदारांचे ओळखपत्र बनण्यास विलंब लागत आहेत. ज्या मतदारांना ओळखपत्र या वेळेला प्राप्त होणार नाहीत. अशा मतदारांना पुढील काही महिन्यांच्या कालावधीत ओळखपत्र प्राप्त होतील.- रावसाहेब गांगुर्डे,नायब तहसीलदार,पनवेल

टॅग्स :Electionनिवडणूक