शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हुश्श…! सारेच विद्यार्थी झाले पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 23:59 IST

पनवेल पालिका क्षेत्रातील १ लाखाहून अधिक मुले गेली पुढच्या वर्गात

कळंबोली : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इयत्ता  पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा शासनाने रद्द केल्या आहेत. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, महापालिका शाळा, खासगी संस्था शाळेतील १ लाख ५२  हजार ८३  विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पुढील शैक्षणिक सत्रात सरळ प्रवेश दिला जाणार आहे. गतवर्षी कोरोनामुळे मार्चपासून शाळा बंद झाल्या होत्या. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची  वार्षिक परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना पास करण्यात आले होते. यंदाही तीच परिस्थिती उद्भवली आहे. याही वर्षी आधीच शाळा भरल्या नाहीत. काही वर्ग भरले तर तेही काही काळ सुरू राहिले. पालकांची मनस्थिती तयार होईपर्यंत दुसऱ्या कोरोनाची लाट आली. त्यामुळे राज्य सरकारने यंदाही पहिली ते आठवीपर्यंच्या विद्यार्थ्यांना  विनापरीक्षा पास केले आहे. यंदा शैक्षणिक वर्षापासून ऑनलाइन त्याचबरोबर जानेवारी ते मार्चपर्यंत ऑफलाइन अशा दोन्ही पध्दतीने शालेय अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून शालेय  शिक्षण विभागाकडून  पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला  आहे. पनवेल तालुक्यात ५५५ शाळा आहेत. यात जिल्हा परीक्षा परिषद, खासगी अनुदानित, विनाअनुदानित व इंग्लिश स्कूल या शाळांचा समावेश होतो. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत १ लाख ५२ हजार ८३ विद्यार्थी संख्या आहे. यामुळे आता हे सर्व विद्यार्थी पुढील वर्गात प्रवेश घेण्यास पात्र ठरले आहेत. तालुक्यातील शाळा व पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी शाळा    संख्या    विद्यार्थी संख्या जिल्हा परिषद    २४८    २१,६५६ महापालिका शाळा    ०११    ०१,९४१ खासगी शाळा    २९६     १,२८,४८६ एकूण    ५५५    १,५२,०८३पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत आहे. त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यांची काळजी घेतली पाहिजे. मुलांच्या मूल्यमापनामध्ये अडचण असली तरी, शासनाकडून परीक्षा रद्द करून पास करण्याचा घेतलेला निर्णय  योग्यच निर्णय आहे. - बालाजी घुमे, शिक्षणतज्ज्ञ ऑनलाइन शिक्षण तसेच स्वाध्यायसारखा उपक्रम असेल त्यात अनेक दुर्गम भागातील मुले सहभागी झाली नव्हती. वाढता कोरोना असल्याने त्यांची काळजी करणे गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने घेतलेला निर्णय योग्यच आहे. पुढील वर्षी सुरुवातीला मागील वर्षाच्या अभ्यासक्रमाचा मात्र आढावा घ्यावा लागेल. - महेश खामकर, गटशिक्षणाधिकारी, पनवेल

टॅग्स :Educationशिक्षण