शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

तळोजा येथे पत्नी, दोन मुलांची हत्या करून पतीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 05:04 IST

दीड महिन्यापासून कोणालाही थांगपत्ता नाही; बंद फ्लॅटमध्ये कुजले मृतदेह

पनवेल : तळोजा फेज वन सेक्टर ९ येथील शिव कॉर्नर सोसायटीत एका बंद घरात शनिवारी चौघांचे मृतदेह आढळले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नी, मुलांची हत्या करून, नंतर नितेश उपाध्याय यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली.नितेश उपाध्याय (३५), बबली उपाध्याय (३०) अशी या पती-पत्नीची नावे असून, मुलांची नावे समजू शकलेली नाहीत. शिव कॉर्नर सोसायटीतील घर नंबर ५०२चे मालक राजेश भारद्वाज यांनी, त्यांचे घर नितेश उपाध्याय यांना सप्टेंबर, २०१९ मध्ये भाड्याने दिले होते. उपाध्याय यांची पत्नी, तसेच दोन मुले या ठिकाणी राहत होते. उपाध्याय हे नियमित ५ ते ६ तारखेला भाडे देत असत. दोन महिन्यांपासून घरभाडे मिळाले नसल्याने भारद्वाज हे उपाध्याय यांना नेहमी फोन करत होते. मात्र, फोनला प्रतिसाद न मिळाल्यामुळे भारद्वाज या सोसायटीत आले व सोसायटीतील सेक्रेटरी व अध्यक्ष यांना घेऊन ते घरात गेले. घर आतून बंद आढळल्याने त्यांनी आपल्याकडील चावीने घराचा दरवाजा उघडला. या वेळी आतील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांना चौघांचे मृतदेह सापडले.सुसाइड नोट सापडलीघटनास्थळी पोलिसांना सुसाइड नोटदेखील सापडली आहे. यात आम्ही आत्महत्याकरत असून, त्याबाबत कोणालाही जबाबदार धरू नये, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच आतील रूममध्ये दागिने आहेत व आमचे कोणीही नातेवाईक नाहीत, असे उपाध्याय यांनी त्यात लिहिलेले आहे. ज्यांना कोणाला आमचे मृतदेह सापडतील, त्यांनी हिंदू धर्मानुसार अंत्यसंस्कार करावे, असे सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्या