शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाच्या भूमिपूजनाची घाई; निवडणुकांवर डोळा, ग्रामस्थांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 03:32 IST

देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून उभारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचे १८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. विमानतळ प्रकल्पाला अडथळा ठरणारे अनेक प्रश्न अद्यापि, जैसे थे आहेत.

नवी मुंबई : देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून उभारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचे १८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. विमानतळ प्रकल्पाला अडथळा ठरणारे अनेक प्रश्न अद्यापि, जैसे थे आहेत. काही मुद्द्यांवर प्रकल्पग्रस्तांचा विरोध आजही कायम आहे. या वस्तुस्थितीला बगल देत राज्य सरकारने विमानतळ प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन सोहळा आयोजित केला आहे. केवळ आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून भूमिपूजनाचा सोपस्कार केला जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सुमारे १६ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या मार्गातील बहुतांशी अडथळे दूर झाले आहेत. जीव्हीके कंपनीला विमानतळ उभारणीचा ठेका देण्यात आला आहे. फायनान्शीयल क्लोजर सादर केल्यानंतर ही कंपनी विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहे. सध्या प्रकल्पपूर्व कामे सुरू आहेत. यात उलवे टेकडीची उंची करणे, जमिनीचे सपाटीकरण, उपºया विद्युतवाहिन्या भूमिगत करणे, तसेच उलवे नदीचे पात्र बदलणे आदी कामांचा समावेश आहे. या कामाला एक ते दीड वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतरच विमानतळ उभारणीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणे अपेक्षित आहे. शिवाय, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाशी संबंधित काही प्रश्न अनुत्तरित आहेत. विमानतळाच्या गाभा क्षेत्रातील दहा गावांच्या स्थलांतराला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. विमानतळाच्या कंत्राटावरून स्थानिकांत संघर्ष सुरू आहे. दिवसाआड आंदोलन करून काम बंद पाडले जात आहे. ही वस्तुस्थिती असताना अचानक प्रकल्पाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आयोजित केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डिसेंबर २०१९मध्ये विमानाचे पहिले उड्डाण होईल, असा दावा राज्य सरकारकडून वेळोवेळी केला जात आहे. शिवाय, लोकसभेच्या निवडणुकासुद्धा २०१९मध्येच आहेत. प्रकल्पाची सध्याची कामाची गती पाहता विमानतळाची डेडलाइन हुकण्याची अधिक शक्यता आहे. असे असले तरी केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई