शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

घणसोली परिसरात शेकडो अनधिकृत फेरीवाल्यांचे बस्तान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 23:35 IST

वाहतुकीस अडथळा : कारवाईची मागणी

नवी मुंबई : सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना, सोशल डिस्टन्सचे पालन न करता, खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी वाहतुकीच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. हे प्रकार त्वरित थांबविण्यासाठी घणसोली परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची जोर धरू लागली आहे.

सुमारे २ लाख लोकसंख्या असलेल्या घणसोली परिसरातील पाच गावे आणि नोड्सचा समावेश असलेल्या एफ विभागातील अनधिकृत फेरीवाल्यांची ठिकाणे - घणसोली रेल्वे स्टेशन पूर्व आणि पश्चिमेला अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट सुरू आहे. घणसोली स्टेशनसमोरील न्यू लाइफ हॉस्पिटलसमोरील मोकळ्या भूखंडावर फळे, भाजीपाला, व्यापारी संकुलाच्या बाहेर मार्जीनल स्पेसमध्ये अनेक नवीन मोटार सायकल, हावरे चौकाजवळ सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर अनेक दुकाने फेरीवाले, तसेच हार्ड वेअर दुकानातील सामान, मुख्य रस्त्यालगत वाहने दुरुस्तीची दुकाने थाटण्यात आलेली आहेत.घणसोली गावात माजी सरपंच दगडू चाहु पाटील चौक, गावदेवी मंदिर परिसर, साई सदानंदनगर ते घणसोली डी मार्ट मॉल परिसर, गावदेवी वाडी रोड ते स्वातंत्र संग्राम चौकापर्यंत वाहतुकीच्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा भरविण्यात येत आहे.रबाले रेल्वे पादचारी भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार, तळवली नाका, रबाले-गोठीवली गाव रस्ता घणसोली गावठाणात काही दुर्घटना घडल्यास, अग्निशमन दलाची गाडी किंवा पोलिसांच्या वाहनांनाही गर्दीतून वाट काढणे मुश्कील होईल, अशी परिस्थिती घणसोली विभागाची झालेली आहे. सध्या कोरोनाच्या भीतीने या गर्दीला घाबरून घरातून बाहेर जाणेही कठीण झाले आहे.पंतप्रधान निधी योजनेंतर्गत रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी परवाना देण्यासाठी प्रत्येकी १० हजार रुपयांचे कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यांचे फॉर्म भरण्याचे काम सुरू आहे. ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल.- अमरीश पटनिगीरे,उपायुक्त, अतिक्रमण विभाग, मुख्यालय

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhawkersफेरीवाले