शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

पनवेलमध्ये महागाई आणखी किती रडविणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 1:42 AM

चार महिन्यांत पेट्रोल-डिझेल १५, तर सिलिंडर १२६ रुपयांनी महागला

- वैभव गायकरपनवेल : महागाईचा आलेख दिवसेंदिवस  वाढत चालला आहे. एकीकडे कोरोनाच्या काळात अनेकांचे व्यवसाय बुडाले आहेत, तर बहुतांश जणांना कामावरून कमी करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत वाढत्या महागाईला प्रत्येकाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या अशा गोष्टीच्या किमतीत वाढ होत असल्याने अनेकांचे जीवन सुसह्य होत चालले आहे.मागील वर्षभरापासून महागाईने सर्वसामान्यांना दिलासा दिलेला नाही. घरगुती सिलिंडरपासून इंधनच्या किमतीत दिवसागणित वाढ होत चालल्याने सर्वच वस्तू महाग होत चालल्या आहेत. भाजीपाला, डाळी आदी सर्वच जीवनावश्यक वस्तू महागल्या आहेत. कोरोनाकाळात अनेकांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे, अशा परिस्थितीत केंद्र सरकार असो वा राज्य सरकार दोघांकडून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी कोणतेच पाऊल उचलताना दिसून येत नाही. राज्यात भरमसाठ वीजबिल वाढीचादेखील प्रश्न अनेकांना भेडसावला. लॉकडाऊनच्या काळात भरमसाठ वीजबिले देण्यात आली. वीजबिले कमी करण्यासंदर्भात शासनाकडून निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना महावितरणकडून याबाबत स्पष्ट नकार देण्यात आल्याने नागरिकांना वाढीव वीजबिलाचा अतिरिक्त फटका बसला आहे. लवकरच पेट्रोल, डिझेलच्या किमती शंभरीकडे वाटचाल करतील असे चित्र आहे. नोकरदारवर्गामध्ये महागाईमुळे कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे. महागाईवर नियंत्रण न आल्यास सर्वसामान्यांच्या भावना आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. कोविडकाळात विविध समस्यांना तोंड देत असताना महागाई कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी शासनामार्फत पाऊल उचलले जातील अशी अशा होती. मात्र राज्य  व केंद्र शासनाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. अद्यापही वेळ गेलेली नाही. शासनाने याबाबत योग्य पाऊल न उचलल्यास सर्वसामान्यांचा उद्रेक होईल.- अभिमन्यू तोडेकर,  खारघर  महागाईकडे बोट दाखवत केंद्रात भाजप सत्तेवर आले. महागाई नियंत्रणात आणली जाईल या आशेने सर्वसामान्यांनी भाजप सरकारला भरभरून मतदान केले. केंद्रात भाजपची एकहाती सत्ता असताना महागाई कमी करण्याऐवजी दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. याबाबत शासनाने गांभीर्यपूर्वक विचार करण्याची गरज आहे.  - गणेश पाटील, पनवेलमहागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असल्याने घरखर्च चालवताना नाकीनऊ येत आहे. सरकारला सर्वसामान्यांची थोडी तरी चिंता असेल तर वाढत्या महागाईवर शासनाने नियंत्रण मिळवावे अन्यथा सरकारला सर्वसामान्यांकडे मत मागण्याचा कोणताच अधिकार नाही. - सोनल साळुंखे,  कळंबोली

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल