शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

विरार-अलिबाग कॉरिडाॅरसाठी किती खारफुटींची हाेणार कत्तल? सागर किनारा प्राधिकरणाची MSRDC विचारणा

By नारायण जाधव | Updated: November 10, 2022 07:21 IST

खारफुटीची नक्की किती झाडे बाधित होणार, अशी विचारणा सागर किनारा नियंत्रण  प्राधिकरणाने रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीकडे केली आहे.

नवी मुंबई :  

मुंबई महानगर प्रदेशातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बहुचर्चित विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यातील नवघर ते चिरनेर या ८० किलोमीटरच्या मार्गात एकूण २३०.१८ हेक्टर जमीन सीआरझेडमध्ये मोडते. यापैकी ५९.२३ हेक्टर जमिनीवरील खारफुटी बाधित होणार आहे. यामुळे खारफुटीची नक्की किती झाडे बाधित होणार, अशी विचारणा सागर किनारा नियंत्रण  प्राधिकरणाने रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीकडे केली आहे.

चेन्नई येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग या संस्थेने तयार केलेल्या नकाशाचा आधार घेऊन एमएसआरडीसीने सीआरझेड प्राधिकरणाची परवानगी मागितली होती. त्यात विरार-अलिबाग मल्टिमाॅडेल कॉरिडाॅरच्या नवघर ते चिरनेर या ८० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यात एकूण २३०.१८ हेक्टर जमीन सीआरझेडमध्ये मोडत असून, पैकी ५९.२३ हेक्टर जमिनीवर खारफुटी असल्याचे म्हटले आहे. याचाच आधार घेऊन सीआरझेड प्राधिकरणाने एकूण  किती झाडे बाधित होणार, मँग्रोव्ह सेलची परवानगी घेतली का? अशी विचारणा केली आहे. मात्र, त्याचे उत्तर एमएसआरडीसीचे अधिकारी  देऊ शकले नाहीत. त्यामुळे या प्रकल्पाची गरज लक्षात घेऊन तातडीने मँग्रोव्ह सेलचा अहवाल सादर करावा, तो आल्यावर तत्काळ परवानगी दिली जाईल, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. या मार्गासाठी वने आणि पर्यावरण मंत्रालयाची परवानगीही अखेर रस्ते विकास मंडळाने मागितली आहे.

असा असेल कॉरिडाॅर८० किलोमीटर लांबीच्या या कॉरिडॉरचा प्रारंभ बिंदू वसईतील बापाणे गावात असून, शेवटचा बिंदू उरणमधील चिरनेर आहे. हा कॉरिडॉर मुंबई-अहमदाबाद महामार्गालाही जोडणार आहे. यामध्ये आठ इंटरचेंज, २८ वाहन अंडरपास, १६ पादचारी अंडरपास आणि १२० कल्व्हर्ट असतील.या महानगरांना होणार फायदाहा मार्ग पूर्ण झाल्यावर परिसरातील ग्रोथ सेंटर, एमआयडीसी आणि वसई-विरार, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई, उरण-पनवेल या महानगरांसह जवाहरलाल नेहरू पोर्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्याचा मोठा लाभ होणार असून, येथील प्रवासी आणि अवजड वाहतूक वेगवान होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :alibaugअलिबागVirarविरार