शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गृहनिर्माण सोसायटी पदाधिकाऱ्यांना पाच वर्षे निवडणूक लढण्यास मनाई

By कमलाकर कांबळे | Updated: February 14, 2024 20:26 IST

उपनिबंधकांनी संपूर्ण कार्यकारिणी केली बरखास्त : कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर १४ येथील न्यू कृष्णा को ऑप. हौसिंग सोसायटीची कार्यकारिणी अपात्र घोषीत करण्यात आली आहे. सिडकोच्या सहकारी संस्था उपनिबंधकांनी ही कारवाई केली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील नियम आणि तरतुदीचे उल्लंघन करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका या कार्यकारिणीवर ठेवला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण कार्यकारिणी अपात्र घोषीत करण्याची नवी मुंबईतील ही पहिलीच घटना असल्याने उपनिबंधनकांच्या या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे नमूद अधिनियमातील तरतुदीनुसार संबधित सदस्यांना पुढील पाच वर्षे सोसायटीची निवडणूक लढविता येणार नाही.

या गृहनिर्माण संस्थेच्या सभासद रमा गुप्ता यांनी तपासणीसाठी बॅंक खात्याचा तपशील, सर्वसाधारण सभा आणि व्यवस्थापकीय बैठकीचा वृत्तांत तसेच इतर आवश्यक कागदपत्रे मिळावेत, अशी मागणी संस्थेकडे केली होती. मात्र अनेकदा पत्रव्यवहार करूनसुध्दा संस्थेच्या कार्यकारिणीकडून त्यांना कोणतीही माहिती उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम ११६० चे कलम १५४ (ब) २३ (१) नुसार संस्थेच्या कार्यकारिणीवर कारवाई करावी, अशी मागणी लेखी अर्जाद्वारे उपनिबंधक कार्यालयाकडे केली होती. या अर्जाच्या अधारे उपनिबंधकांनी कार्यकारिणीला नोटीस बजावून आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते.दोन वेळा संधी देऊन बाजू मांडली नाही

यासंदर्भातील पहिल्या सुनावणीला गृहनिर्माण संस्थेचे वकील उपस्थित राहिले. लेखी म्हणणे मांडण्यासाठी त्यांनी मुदत देण्याची विनंती केली. त्यानुसार संस्थेला दोन वेळा संधी देण्यात आली. मात्र त्यानंतरसुद्धा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले म्हणणे मांडले नाही. याची गंभीर दखल घेत उपनिबंधक प्रताप पाटील यांनी संस्थेचे अध्यक्ष प्रणव जॉय मुखर्जी, सचिव अस्मिता अतुल तेंडुलकर, खजिनदार कनवर दिप सिंग यांनी आपली जबाबदारी पार पाडण्यात कुचराई दाखविल्याचा ठपका ठेवून सहकारी संस्था अधिनियमाचे कलम १५४ -ब ८ (१) (२) नुसार त्यांना अपात्र घोषित केले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक