शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमधील वेटर सिद्धेश म्हाबदीने वाचवले ८ जणांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 02:33 IST

विलेपार्ले दीक्षित रोड येथे सॅटेलाइट हॉटेलशेजारील विहिरीचा स्लॅब कोसळून सायंकाळी घडलेल्या घटनेत चिमुरडीसह दोन महिलांना हकनाक जीव गमवावा लागला

मनोहर कुंभेजकर मुंबई : विलेपार्ले दीक्षित रोड येथे सॅटेलाइट हॉटेलशेजारील विहिरीचा स्लॅब कोसळून सायंकाळी घडलेल्या घटनेत चिमुरडीसह दोन महिलांना हकनाक जीव गमवावा लागला. मात्र या दुर्घटनेत नजीकच्या हॉटेलमध्ये वेटरचे काम करणाऱ्या सिद्धेश म्हाबदीने प्रसंगावधान दाखवत तब्बल ८ महिलांचे प्राण वाचवल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या या धाडसाचे विभागातून कौतुक केले जात आहे.

दापोली मंडणगड येथील रहिवासी असलेला सिद्धेश गेल्या काही काळापासून या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी काम करत आहे. नेहमीप्रमाणे सिद्धेश हॉटेलमध्ये ग्राहकांच्या सेवेत व्यस्त होता. मात्र अचानक विभागात गोंधळ सुरू झाल्याचे पाहून त्याने तत्काळ हॉटेलबाहेर धाव घेतली. विहिरीचा स्लॅब कोसळल्याने काही महिला विहिरीत पडल्याचे चित्र त्याने पाहिले. क्षणाचाही विलंब न करता सिद्धेश त्यांच्या मदतीसाठी धावला. त्याने विहिरीत बांबू सोडत बुडत्या महिलांना आधार दिला तसेच स्वत:च्या जीवाची पर्वा न करता उरलेल्या महिलांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली. एकूण ८ महिलांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात सिद्धेशला यश आले.

या दुर्घटनेची माहिती कळताच विलेपार्लेचे भाजपा आमदार अ‍ॅड. पराग अळवणी घटनास्थळी पोहोचले. त्यांच्याशिवाय स्थानिक शिवसैनिक मंगेश नाईक, मुन्ना साबळे, नितीन डिचोलकर यांच्यासह अनेक शिवसैनिक अग्निशमन दलाच्या मदतीसाठी पोहोचले होते. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी इस्पितळात जाऊन जखमींची भेट घेतली. पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे आणि विलेपार्ले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्वरित क्रेन मागवून मदतकार्य गतिमान केले. तसेच पोलीस यंत्रणा तैनात केल्याची माहिती प्रशासनाने दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई