शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांना कोरोनाचा फटका, ग्राहकांची संख्या रोडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 03:45 IST

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येचे गांभीर्य व्यक्त केले जात आहे. नवी मुंबईतही कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या असून त्या शहराबाहेरील आहेत

नवी मुंबई : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून गर्दी जमण्याच्या ठिकाणांवर बंदी घालण्यात आली आहे. अशातच खबरदारीचा उपाय म्हणून काही हॉटेल व्यावसायिकांनीही स्वेच्छेने व्यवसाय बंद करण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे नेहमीची वर्दळीची असणारी ठिकाणेही ओस पडली आहेत.राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येचे गांभीर्य व्यक्त केले जात आहे. नवी मुंबईतही कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या असून त्या शहराबाहेरील आहेत; परंतु त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेने गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घातली आहे. त्यामध्ये उद्याने, हॉल, नाट्यगृह, चित्रपटगृहे यांचा समावेश आहे. त्याशिवाय सार्वजनिक सभा व कार्यक्रमांवरही बंदी घातली आहे. गर्दीच्या ठिकाणी एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीचा वावर झाल्यास अनेकांना त्याचा संसर्ग होऊ शकतो, तर त्यांच्या माध्यमातून हा संसर्ग अधिक फैलावण्याचा धोका आहे. त्यामुळे हॉटेल व बारही ठरावीक कालावधीसाठी बंद ठेवले जावेत, अशी मागणी होत आहे; परंतु प्रशासनाने जरी त्यासंदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नसला, तरी काही हॉटेल व्यावसायिकांनी मात्र स्वेच्छेने व्यवसाय बंद करून कामगारांनाही सुट्टी देण्यात आली आहे. यामुळे त्यांना रोजचा १० ते ५० हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. तर जे हॉटेल अद्यापही सुरू ठेवण्यात आले आहेत, त्या ठिकाणी नागरिकच जायचे टाळत आहेत, यामुळे नेहमी ग्राहकांची वर्दळ असणारी हॉटेल मागील दोन दिवसांपासून ओस पडली आहेत; परंतु हॉटेल व बार यामध्ये जमणाऱ्या गर्दीच्या बाबतीत प्रशासनाने अद्याप गांभीर्य घेतले नसल्याची टीका सर्वसामान्यांकडून होत आहे. परिणामी, शहरातील सर्व्हिसबार व बेकायदेशीरपणो चालणारे डान्सबार अद्यापही रात्री उशिरापर्यंत चालवले जात आहेत.हॉटेलचालक संघटनेच्या निर्णयाकडे लक्षहॉटेलमध्ये ग्राहकांच्या स्वरूपात जमणारी गर्दी कोरोनाच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरू शकते. यानंतरही इतर आस्थापने व कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेणाºया प्रशासनांना हॉटेल व बारचा विसर पडल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, काही व्यावसायिकांनी स्वेच्छेने हॉटेल्स बंद ठेवली आहेत. हॉटेलचालक संघटना काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सुरक्षेसाठी हॉटेल बंद करून कामगारांनाही सुट्टी देण्यात आली आहे, यामुळे रोजचे २० ते २५ हजार रुपयांचे नुकसान होत आहे; परंतु स्वत:च्या तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने इतर हॉटेल व्यावसायिकांनीही तसा निर्णय घेणे गरजेचे आहे.- संदीप पाटील, हॉटेल व्यावसायिक, कोपरखैरणे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबईhotelहॉटेल