शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
2
आजोबा, वडील एक्स आर्मी... पतीही मेजर! कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी...
3
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
4
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
5
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
6
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
7
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
8
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
9
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
10
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
13
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
14
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
15
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
16
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
17
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
18
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
19
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
20
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम

समाधीस्थळी बनणार इतिहास अभ्यास केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 03:44 IST

शासनाकडे पाठपुरावा सुरू : बाळाजी चिटणीस यांचे समाधीस्थळ संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी

नामदेव मोरेनवी मुंबई : सुधागड तालुक्यामधील आवंढे येथे स्वराज्यातील अष्टप्रधानांपैकी एक बाळाजी आवजी चिटणीस यांची समाधी आहे. हे समाधीस्थळ संरक्षित स्मारक घोषित करावे. पर्यटनस्थळांच्या यादीमध्ये त्याचा समावेश करावा, अशी मागणी बाळाजी आवजी चिटणीस चॅरिटेबल ट्रस्टने केली आहे. समाधीस्थळी इतिहास अभ्यास केंद्र उभारण्याचा संकल्प केला असून, त्यासाठी जिल्हा परिषद, शासन व पुरातत्त्व विभागाकडेही पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरू केला आहे.

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेमुळे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या कर्तृत्वाची गाथा प्रत्येक घराघरांमध्ये पोहोचू लागली आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुकाही चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेबाचा मुलगा अकबर यांची भेट झालेली होती. गडापासून काही अंतरावर असलेल्या परळीजवळील आवंढे गावच्या हद्दीमध्ये अण्णाजी दत्तो, सोमाजी दत्तो व इतरांना हत्तीच्या पायी देण्यात आले होते. गैरसमजातून बाळाजी आवजी चिटणीस यांनाही शिक्षा देण्यात आली होती; परंतु नंतर ते निर्दोष असल्याचे लक्षात आल्याने त्या ठिकाणी बाळाजींची छोटी समाधी बनविण्यात आली होती. तीन शतकांपासून ग्रामस्थांनी या समाधीची देखभाल केली आहे. त्रिपुरारी पोर्णिमेला येथे दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. ग्रामस्थच समाधीची देखभाल करत आले आहेत. ग्रामस्थ व बाळाजींचे वारसदार यांनी बाळाजी आवजी चिटणीस चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली असून, त्या माध्यमातून येथे कार्यक्रम केले जातात. ट्रस्टने २०१३ पासून जि. परिषद, राज्य शासन, पुरातत्त्व विभाग यांच्याकडे पाठपुरावा करून या समाधीस्थळाचा विकास करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला.पाच वर्षांपूर्वी समाधीस्थळी कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यानंतर आमदार धैर्यशील पाटील यांनी या परिसरातील रोडसाठी आठ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. रायगड जिल्हा परिषदेमध्ये २०१७ मध्ये समाधीस्थळाला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यासाठीचा ठराव मंंजूर केला आहे. समाधीस्थळाजवळील दोन एकर जमीन शासनाने संपादित करून ट्रस्टच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे. शासनाने पुरातत्त्व विभागाला उचित कार्यवाही करण्यास सुचविले आहे. पुरातत्त्व विभागाचे तत्कालीन संचालक भा. वि. कुलकर्णी यांनी या ठिकाणाची पाहणी करून समाधीस्थळ संरक्षित स्मारक घोषित करण्यासाठीची कार्यवाही सुरू केली आहे. या ठिकाणी संरक्षित स्मारक घोषित झाल्यानंतर तेथे इतिहास अभ्यास केंद्र उभे करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.समाधीस्थळाचा असा होणार विकासच्बाळाजी आवजी चिटणीस ट्रस्टचे अध्यक्ष सातारा येथील शिरीष चिटणीस असून, संजय चिटणीस हे सचिव आहेत. आमदार धैर्यशील पाटील कार्याध्यक्ष असून, साहित्यिक सदानंद मोरे, इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे व आवंढे येथील इतर मान्यवरही ट्रस्टमध्ये आहेत. मोरे व बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केंद्राची रूपरेषा निश्चित केली आहे.च्बाळाजी आवजी चिटणीस यांच्या हस्ताक्षरातील २५० पत्रे उपलब्ध आहेत. यामधील काही मुंबईमधील एल्फिन्स्टन महाविद्यालय व काही कोल्हापूरमधील शाहू दफ्तरात आहेत. ही पत्रे अभ्यासासाठी उपलब्ध केली जाणार आहेत.च्छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील ग्रंथही येथे ठेवण्यात येणार आहेत. बाळाजी आवजी यांचा इतिहास. खंडोबल्लाळ चिटणीस यांनी केलेले कार्यही चित्ररूपाने येथे रेखाटण्याचा संकल्प असल्याची माहिती संजय चिटणीस यांनी दिली.रायगड जिल्हा परिषदेने २०१७ ला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ घोषित करण्यासाठीचा ठराव मंजूर केला आहे. पुरातत्त्व विभागानेही संरक्षित स्मारक घोषित करण्यासाठीची कार्यवाही सुरू केली आहे. समाधीस्थळाचा विकास करून इतिहास अभ्यास केंद्र तयार करण्याचा संकल्प आहे.- संजय चिटणीस, सचिव, बाळाजी आवजी चिटणीस चॅरिटेबल ट्रस्टगावच्या परिसरामध्ये बाळाजी आवजी चिटणीस यांची समाधी आहे. ग्रामस्थ वर्षानुवर्षे त्याची देखभाल करत आहेत. या ठिकाणी पौर्णिमेला दीप लावले जातात. समाधीस्थळाच्या विकासासाठी पाठपुरावा सुरू आहे.- उत्तमराव देशमुख, सरपंच, आवंढेसुधागड परिसरामध्ये अनेक महापुरुषांच्या समाधी आहेत. यामधील आवंढेमध्ये बाळाजी आवजी चिटणीस यांचीही समाधी आहे. नागरिकांनी इतिहासाच्या खुणा जपून ठेवल्या आहेत.- जयसिंग गोळे, माजी मुख्याध्यापक, शारदा विद्यालय, पेडली

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई