शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

उच्चशिक्षित युवकांनी जपली लोककला

By admin | Updated: July 6, 2017 06:37 IST

भारतीय लोककला हा आपल्या संस्कृतीमधील एक महत्त्वाचा घटक आहे. या लोककलांमध्ये अनेक लोककला या पारंपरिक

- दाजी कोळेकर भारतीय लोककला हा आपल्या संस्कृतीमधील एक महत्त्वाचा घटक आहे. या लोककलांमध्ये अनेक लोककला या पारंपरिक पद्धतीने जपल्या जात असून त्या एका पिढीकडून दुसऱ्या पुढच्या पिढीकडे संक्रमित होत असल्याचे दिसून येते. अशा काही लोककलांमध्ये गजनृत्य म्हणजेच कैपत नृत्य ही कला आहे. ही लोककला मुंबईसारख्या महाकाय नगरीमध्ये आजही जतन केली जात असल्याचे दिसून येते आणि तीही उच्चशिक्षित तरुण पिढीकडून शिक्षण घेत व रोजगार करत.बिरोबा देवस्थान असणारे सांगली जिल्ह्यातील आरेवाडी हे गाव या लोककलेमुळे नावारूपास येत आहे. आरेवाडीमध्ये मागील शेकडो वर्षांपासून ही लोककला जपली जात असून या गावातील रोजगारासाठी मुंबईत आलेल्या काही युवकांनी गेल्या ५० वर्षांपासून ही कला जपण्यासाठी धडपड सुरू केली. मुंबईमध्ये या लोककलेला व्यासपीठ आणि वैभव मिळवून देण्यासाठी माजी मंत्री शिवाजीराव (बापू) शेंडगे आणि मेंढपाळ कामगार नेते पांडुरंग कोळेकर यांनी मोलाचे योगदान दिले आणि त्याचाच लाभ उठवत सर्वांच्या सहकार्याने आकाराम कोळेकर यांनी ही लोककला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविली. १९८९ साली मुंबईमध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ‘अपना उत्सव’ मध्ये सहभाग घेवून वाहवा मिळविल्यानंतर ही लोककला चांगलीच चर्चेत आली आणि मुंबईच्या सांस्कृतिक वैभवातील एक महत्त्वाचा घटक बनली.अशी ही पारंपरिक लोककला घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या आणि धावपळीचे जीवन जगणाऱ्या महाकाय नगरीमध्ये आजही जपली जात आहे आणि तीही उच्चशिक्षित तरुणांकडून. मुंबईतील ५० वर्षांची परंपरा असणाऱ्या या लोककलेचा आता दुसरी पिढी वारसा चालवत आहे. या लोककलेमधील अनेक युवक अभियांत्रिकी, व्यवस्थापनातील पदवीचे शिक्षण घेत आहेत, तर काही शिक्षण पूर्ण करून विविध क्षेत्रात नोकरीही करीत आहेत. पण हे करत असताना आपल्या लोककला जतनामध्ये ते कुठेही कमी पडत नाहीत. आपल्या पूर्वजांसारखे तितकेच जोमाने ही लोककला जतन करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे ही लोककला मुंबईच्या सांस्कृतिक वैभवात आणखी भर घालत नावारूपास येईल असेच या पिढीजात परंपरेवरून दिसून येत आहे.अनेक दिग्गजांकडून गजनृत्य कलेचे कौतुक : शेकडो वर्षांची मूळ परंपरा असलेल्या या लोकक लेने मागील ३०-४० वर्षांमध्ये मुंबईसह राज्याचे अनेक ठिकाणी प्रतिनिधित्व करत आपली लोकप्रियता वाढवली आहे. देशातील अहमदाबाद ते आसाम आणि हरियाणा ते कन्याकुमारी अशा विविध ठिकाणी पार पडलेल्या सांस्कृतिक महोत्सवांमध्ये आपली ढंगदार लोककला सादर करून वाहवा मिळविली आहे. ही लोककला देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंपासून ते आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक पंतप्रधानांनी व राष्ट्रपतींनी या लोककलेचा आस्वाद घेत कौतुक केले आहे. देशातील प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये आणि मोठ्या शहरवासीयांनी ही लोककला पाहिली आहे. या लोककलेच्या इतिहासामध्ये १९५८ दिल्ली दौरा, २००१ चा पहिला आंतरराष्ट्रीय इंग्लंड दौरा आणि २००९ मधील रशियाचा दौरा, हे ऐतिहासिक आणि पे्ररणादायी दौरे असल्याचे दिसून येते. १५० वर्षे राज्य केलेल्या ब्रिटिशांकडून मानाचा मुजरा : आॅगस्ट २००१ मध्ये या लोककलाकारांनी इंग्लंडमधील एडिंबर्ग आणि स्कॉटलंडमध्ये आपली कला सादर करून पहिला आंतरराष्ट्रीय दौरा केला. त्या वेळी भारतावर १५० वर्षे राज्य करणाऱ्या गोऱ्या साहेबांनी या कलावंतांना सलाम केला. या आंतरराष्ट्रीय दौऱ्यामध्ये मुंबईकरांना भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रात मुंबईसह महाराष्ट्राचा दबदबा वाढत गेला.