शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत पावसाचा जोर कायम, ठिकठिकाणी साचले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 01:04 IST

नवी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरात ४ जुलैपासून १० दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीपेक्षा या वर्षी शहरातील मान्सूनपूर्व कामांना उशिराने सुरुवात करण्यात आली होती.

नवी मुंबई : शहरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. शहरात लॉकडाऊन असल्याने वाहतूक आणि जनजीवनावर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. तरी शहरात ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना मात्र घडत आहेत. यामुळे मान्सूनपूर्व कामांचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दरम्यान, ऐरोलीत झाड कोसळून एका व्यक्तिचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली आहे.नवी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरात ४ जुलैपासून १० दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीपेक्षा या वर्षी शहरातील मान्सूनपूर्व कामांना उशिराने सुरुवात करण्यात आली होती. ३ जुलैपासून शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, दिघा, ऐरोली सर्वच विभागांत जोरदार पाऊस पडत आहे. मागील पाच दिवसांत शहरात एकूण ४९३.६0 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरातील विविध भागांत पाणी साचण्याच्या, तसेच झाडे कोसळण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. मंगळवारी झालेल्या पावसामुळे बेलापूरमधील कोकणभवन इमारतीच्या आवारात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते, तसेच शिरवणे भुयारी मार्ग, ज्वेल आॅफ नवी मुंबई, तसेच शहराच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मे महिन्यात मान्सूनपूर्व कामे करताना पावसाळी नाल्यांची सफाई झाली नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत, तसेच धोकादायक झाडांची छाटणीसुद्धा करण्यात आलेली नाही. त्यामुळे गेल्या महिन्यात आलेल्या निसर्ग वादळात शहराच्या विविध भागांत शेकडो झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. मंगळवारी वाशीत एका वाहनावर झाड कोसळले.पनवेलमधील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारापनवेल : मागील दोन दिवसांपासून पनवेल तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पनवेलमधील गाढी, तसेच कासाडी यांच्यासह उपनद्या ओसंडून वाहत असल्याने, तहसीलदारांनी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याने माथेरानच्या डोंगरांतून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी पनवेलच्या दिशेने वाहत आहे.तालुक्यातील जवळजवळ ४0 ते ५0 नदीकाठच्या गावांना अतिवृष्टीमुळे दरड कोसळणे, गावात पाणी शिरल्याचा धोका असल्याने तहसीलदार अमित सानप यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे, तसेच नदीपात्रात न उतरणे, जनावरांना नदीपात्रात न सोडण्याच्या खबरदारी ग्रामस्थांनी घेण्याचे अवाहन सानप यांनी केले.

 

टॅग्स :RainपाऊसNavi Mumbaiनवी मुंबई