शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

पाणीबाणी! दोन गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 4:33 AM

सलग तिसऱ्या दिवशी नवी मुंबईसह पनवेलला पावसाने झोडपले. गाढीसह सर्व नद्यांनी रौद्र रूप धारण केले असून काठावरील गावांना धोक्याचा इशारा दिला आहे. नवी मुंबईमधील गणपतीपाडा येथे टेकडीवरील घर कोसळले.

नवी मुंबई, पनवेल -  सलग तिसऱ्या दिवशी नवी मुंबईसह पनवेलला पावसाने झोडपले. गाढीसह सर्व नद्यांनी रौद्र रूप धारण केले असून काठावरील गावांना धोक्याचा इशारा दिला आहे. नवी मुंबईमधील गणपतीपाडा येथे टेकडीवरील घर कोसळले. कोपरखैरणेमध्येही घरातील स्लॅबचा भाग कोसळल्याची घटना घडली असून महामार्गावरील चक्काजामची स्थिती कायम आहे.पावसाचा जोर कायम असल्याने पनवेल तालुक्यातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. तालुक्यातील गाढी, कासाडी या नद्या दुथडी वाहत होत्या. शहरात सखल भागात पाणी साचल्याचे यावेळी पाहावयास मिळाले. तसेच तालुक्यातील सिद्धी करवले व तळोजा या गावांना जोडणारा डांबरी रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याची घटना देखील आज घडली. खारघरमधील पांडवकडा तसेच तालुक्यातील इतर धबधबे यावेळी ओसंडून वाहत होते. पावसाचा सर्वात जास्त फटका मुंबई-गोवा व सायन-पनवेल या महामार्गांना बसला आहे. या मार्गावर हजारो खड्डे पडले असून वाहतुकीचा वेग मंदावला आहे. सायन-पनवेल महामार्गाची मोठी दुर्दशा होऊन देखील प्रशासनामार्फत योग्य उपाययोजना राबविल्या जात नाहीत. विशेष म्हणजे खारघरपासून कळंबोलीपर्यंत वाहनांच्या सुमारे तीन ते चार किमी रांगा लागून देखील खारघर टोल नाक्यावर सर्रास टोल वसुली सुरू आहे. कळंबोली, खारघर, उरण फाटा या ठिकाणी महामार्गावर पाणी साचल्याचे यावेळी पाहावयास मिळाले.अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. मात्र सतत तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे तहसील कार्यालय, महानगर पालिका प्रशासन व सिडकोच्या अधिकाºयांची चांगलीच तारांबळ उडालेली यावेळी पाहावयास मिळाली. कळंबोली शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. कळंबोली शहर हे सखल भागात वसले असल्याने दरवर्षी अतिवृष्टीमुळे कळंबोली शहरात ठिकठिकाणी पाणी साचत आहे. पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात देखील या पावसाचा मोठा फटका बसला आहे.वाहतूककोंडीकधी सुटणार?सायन- पनवेलसह मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. एक आठवड्यापासून सातत्याने रोज वाहतूककोंडी होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदारही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून नागरिकांमधील असंतोष दिवसेंदवस वाढत चालला आहे.गणपतीपाडामध्ये भीतीचे वातावरणएमआयडीसीमधील गणपतीपाडा परिसरात जय कुमार यांचे घर दुपारी ३ वाजता पावसामुळे कोसळले. घरात सात सदस्य असून सगळे कामासाठी एपीएमसीमध्ये गेले असल्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. शिवसेना शाखा प्रमुख महेश कोठीवाले, सिद्धराम शिलवंत व इतर कार्यकर्त्यांनी तत्काळ घटनास्थळी जावून मदतकार्य सुरू केले. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांनी व विभाग कार्यालयातील कर्मचाºयांनीही घटनास्थळी जावून पाहणी केली. याठिकाणी जवळपास १५ घरांना धोका असून पाऊस असाच सुरू राहिला तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सायन-पनवेल महामार्गावर तात्पुरती मलमपट्टीसायन-पनवेल महामार्गावर अनेक कामे अर्धवट ठेवण्यात आली आहेत. खारघर टोल नाक्यावर खोदकाम करून सार्वजनिक बांधकाम विभाग मोकळे झाले आहे. याठिकाणी मोठ्या अपघाताचा धोका असल्याचे नगरसेवक गुरु नाथ गायकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या पत्रात कळविले आहे. मात्र तात्पुरती मलमपट्टी लावून सार्वजनिक बांधकाम विभाग मोकळे होत असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीरतीन दिवस सतत कोसळणाºया पावसामुळे धोकादायक इमारती कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारी कोपरखैरणेमधील चंद्रलोक गृहनिर्माण सोसायटीमधील योगेश पाटील यांच्या घरातील स्लॅबचा काही भाग कोसळला. नगरसेवक रामदास पवळे यांनी तत्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली.पनवेलमधील पुलाला गळतीपनवेल शहरातून जाणाºयाडॉ. नानासाहेब धर्माधिकारी उन्नत पुलाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. उड्डाणपुलावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी जोडलेले पाइप यांची व्यवस्थित जोडणी नसल्याने जवळजवळ ५0 ठिकाणी गळती लागली आहे. विशेष म्हणजे या गळतीमुळे तयार झालेले पाण्याचे फवारे या मार्गावरून जाणाºया वाहन चालकांच्या अंगावर पडत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या गळतीला लहान धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

टॅग्स :RainपाऊसNavi Mumbaiनवी मुंबई