शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवर झेंडूच्या फुलांचे ढीग; शेतकरी राहिला उपाशी, भाव घसरल्याने नुकसान

By नामदेव मोरे | Updated: October 25, 2023 09:52 IST

शिल्लक फुले फेकून देण्याची वेळ

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : कुटुंबीयांसोबत आपण दसऱ्याचा आनंद घेत असताना फूल उत्पादक शेतकऱ्यांना मात्र दोन दिवस पदपथावर मुक्काम करावा लागला. यावर्षी भाव घसरल्यामुळे तसेच ऑक्टोबर हीटचा फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. उत्पादन जास्त व ग्राहक कमी असल्यामुळे शिल्लक फुले फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याचे चित्र मंगळवारी नवी मुंबईतील विविध रस्त्यांवर दिसले.

घर, दुकान व वाहनांवर दसऱ्याच्या दिवशी फुलांचे तोरण लागावे यासाठी शेतकरी तीन महिने शेतात दिवसरात्र कष्ट घेतात. पूर्वी मुंबईमधील फूल मार्केट व किरकोळ विक्रेत्यांना फुलांची विक्री केली जायची; पण उत्सव काळात भाव घसरत असल्यामुळे प्रचंड नुकसान सहन करावे लागते. यामुळे पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर, घोडेगाव या परिसरातील शेतकऱ्यांनी स्वत:च फुलांची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.

 प्रत्येक वर्षी १०० ते १५० शेतकरी नवी मुंबईमधील वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, सानपाडा, नेरूळ व इतर ठिकाणी पदपथ व मार्केट परिसरात फूलविक्रीचा व्यवसाय करतात.

ऑक्टोबर हीटचाही बसला फटका 

यावर्षी नवी मुंबईत ठिकठिकाणी शेतकरी बाजार भरला होता. रविवारी सायंकाळीच शेतकऱ्यांनी येथे हजेरी लावली होती. प्रत्येक शेतकऱ्याने ३०० ते ५०० किलो फुले आणली होती. गतवर्षी दसऱ्याला १५० ते २०० रुपये किलो असा झेंडूला भाव मिळाला होता. यावर्षी उत्पादन जास्त असल्यामुळे भाव कोसळून ५० ते ८० रुपये किलो झाले आहेत. उन्हामुळे फुले लवकर सुकत होती.

दसऱ्याला झेंडूच्या फुलांना मागणी असल्यामुळे प्रत्येक वर्षी फुलांची विक्री करण्यासाठी नवी मुंबईमध्ये येत असतो. यावर्षी फुलांचे दर घसरले. उन्हामुळेही विक्रीवर परिणाम झाला. अपेक्षित लाभ झाला नाही. शिल्लक माल फेकून द्यावा लागल्यामुळे नुकसान सहन करावे लागले. - बाळू टोके, शेतकरी, पुणे 

व्यापाऱ्यांना फुले देण्यापेक्षा स्वत: विक्री केल्यास अधिक फायदा होतो. यामुळे प्रत्येक वर्षी दसरा व दिवाळीला नवी मुंबईमध्ये येतो. यावर्षी भाव कमी झाल्याने अपेक्षित फायदा झाला नाही. - अरुणा बारवे, शेतकरी, घोडेगाव,  जि. पुणे

 

टॅग्स :Farmerशेतकरी