शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
2
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
5
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
6
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
8
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
9
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
10
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
11
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
12
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
13
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
14
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
15
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
16
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
17
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
18
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
19
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
20
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका

उरणमधील आरोग्य सेवा ढासळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 02:25 IST

उरण परिसरातील इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालय आणि कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य सेवा पुरती ढासळली आहे.

मधुकर ठाकुर ।उरण : डॉक्टर, कर्मचाºयांच्या कमतरतेमुळे गरिबांसाठी उभारण्यात आलेले उरण परिसरातील इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालय आणि कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य सेवा पुरती ढासळली आहे. या ढासळत्या आरोग्य सेवेमुळे गरीब-गरजू रुग्णांची प्रचंड हेळसांड होऊ लागल्याने गरीब रुग्णांना उपचारही मिळणे कठीण झाले आहे. इंदिरा गांधी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकच आजारी असल्याने रुग्णालयच सध्या आजारी झाले आहे.गरिबांना अल्पदरात वैद्यकीय सेवा देण्यासाठी उरण शहरात इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालय आहे. दररोज २५०-३०० बाह्य रुग्णांची तपासणी केली जाते. वैद्यकीय अधीक्षक आणि एक प्रशिक्षित डॉक्टर सध्या रुग्णालयात नियुक्त आहेत. उर्वरित पदे रिक्तच आहेत. इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालयाचा डोलारा सांभाळणारे वैद्यकीय अधीक्षकच मागील दहा दिवसांपासून आजारी असल्याने रजेवर आहेत. त्यामुळे रुग्णालयाचा ताण सध्या एकाच उपलब्ध असलेल्या प्रशिक्षित डॉक्टरांवर येऊन पडला असल्याची माहिती इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालय सूत्रांनी दिली. मात्र दररोज येणाºया बाह्य रुग्णांची संख्या सुमारे ३०० च्या आसपास असल्याने उपचारासाठी येणाºया गरीब-गरजू रुग्णांना सध्या उपचार मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे परवडत नसतानाही शेकडो गरीब-गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे.सध्या कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी वारंवार रुग्णालयात गैरहजर राहात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राचीही अवस्था रुग्णांसाठी गंभीर बनली आहे. याप्रकरणी मनसेचे रुपेश पाटील आणि तालुका उपाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा, तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्षच केले जात असल्याचा त्यांचा आरोप आहे.सध्या पावसाळ्यात अनेक साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव आहे. तसेच ग्रामीण भागातून सर्पदंश, विंचूदंश, श्वानदंशाच्या रुग्णातही वाढ होत आहे. मात्र सध्या तरी गरीब-गरजूंसाठी असलेले इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालय आणि कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर, कर्मचाºयांच्या कमतरतेमुळे वेळेवर उपचार मिळत नाहीत.याकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्याने उरण परिसरातील गरीब-गरजू रुग्णांना सध्या तरी कुणीही वालीच उरला नसल्याची संतप्त भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.<उरण परिसरातील ग्रामीण भागातील गरीब-गरजू रुग्णांसाठी असलेल्या कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्थाही गंभीर आहे.या प्राथमिक आरोग्य केंद्रातही वैद्यकीय अधीक्षक १, वैद्यकीय अधिकारी २, ज्युनिअर क्लार्क १, सफाई कामगार २, प्रयोगशाळा सहाय्यक १ आणि कक्ष सेवक १ अशी पदे रिक्त असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.>उरणमध्ये डॉक्टरांची कमतरता आहे. तीन एमबीबीएस डॉक्टर आणि मेडिकल सुप्रिडेन्टची गरज आहे. इतर पदे भरण्याची मागणी के ली आहे.सध्या इंदिरा गांधी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकच आजारी असल्याने ते रजेवर आहेत.- डॉ.अजित गवळी,जिल्हा शल्यचिकित्सक