शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

सव्वा लाख नागरिकांची आरोग्य तपासणी; एपीएमसीत १ लाख १५ हजार मास्कचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 01:27 IST

पाच लाख नागरिकांचे तापमान तपासले

- नामदेव मोरेनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने पाचही मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. दोन महिन्यांमध्ये तब्बल १ लाख २७ हजार नागरिकांची तपासणी केली आहे. आतापर्यंत १ लाख १५ हजार नागरिकांना मास्कचे वाटप केले असून ४ लाख ९९ हजार जणांचे तापमान तपासले असून अशा प्रकारे यंत्रणा राबविणारी नवी मुुंबई देशातील एकमेव बाजार समिती ठरली आहे.

मुंबईसह नवी मुंबईमधील दीड कोटी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची जबाबदारी बाजार समितीवर आहे. २० मार्चपासून अनेक संकटांना सामोरे जाऊन प्रशासनाने मुंबईकरांना अन्नधान्याचा नियमित पुरवठा करण्यात यश मिळविले आहे. मार्केटमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे ११ ते १७ मे दरम्यान सलग सात दिवस पाचही मार्केट बंद ठेवावी लागली होती. पुन्हा अशी स्थिती येऊ नये यासाठी बाजार समिती प्रशासनाने सुरक्षेसाठीच्या उपाययोजना कडक करण्यास सुरुवात केली आहे. दोन महिन्यांपासून प्रत्येक मार्केटनिहाय वेगवेगळी उपाययोजना केली आहे. गर्दी कमी करण्यासाठीही आवक नियंत्रित ठेवली आहे.

ओळखपत्र असल्याशिवाय व मास्क परिधान केल्याशिवाय मार्केटमध्ये प्रवेशच दिला जात नाही. रांग लावण्यासाठी बॅरिकेड तयार केले आहेत. आतमध्ये येणाºया प्रत्येकाची आरोग्य तपासणी केली जात आहे. आवक गेटवर वैद्यकीय पथक तैनात केले आहे. प्रत्येकाला हातावर सॅनिटायझर दिले जात आहे. मास्क नसेल तर एपीएमसीच्या वतीने मोफत मास्क उपलब्ध करून दिला जात आहे. थर्मल गनद्वारे तापमान मोजण्यात येत आहे. प्रत्येकाचे पल्स आॅक्सिमीटरद्वारे रक्तातील आॅक्सिजनचे प्रमाण तपासण्यात येत आहे.

एपीएमसीमध्ये येणाºया प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात येत असल्यामुळे जर कोणाची प्रकृती ठीक नसेल तर तत्काळ लक्षात येऊ लागले आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली तर तत्काळ त्याचा स्वॅब घेऊन तपासणी केली जात आहे. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर प्रत्येकाला वैद्यकीय तपासणी प्रवेशपत्र दिले जात आहे. मार्केटमध्ये सुरक्षारक्षक व बाजार समितीचे कर्मचारी खरेदीदार व इतरांकडे प्रवेशपत्र आहे का, याचीही तपासणी करत आहेत. जर कोणाकडे पत्र मिळाले नाही तर त्यांच्यावर एक हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे.

देशातील एकमेव बाजार समिती

मार्केटमध्ये येणाºया प्रत्येकाची आरोग्य तपासणी करणारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही एकमेव बाजार समिती आहे. बाजार समिती व्यतिरिक्तही इतर कोणत्याच संस्थेमध्ये प्रत्येकाची नियमित आरोग्य तपासणी केली जात नाही. मास्क व सॅनिटायझरचा पुरवठा, वाहनांचे निर्जंतुकीकरण, मार्केटचे नियमित निर्जंतुकीकरण केले जात आहे. प्रत्येकाचे तापमान व आॅक्सिजन तपासले जात असून अशा प्रकारे उपाययोजना राबविणारी मुंबई बाजार समिती एकमेव संस्था ठरली आहे.

मुंबई, नवी मुंबई व उपनगरांमधील नागरिकांना अन्नधान्याचा नियमित पुरवठा करण्यासाठी बाजार समिती कटिबद्ध आहे. मार्केटमध्ये येणाºया प्रत्येकाची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. पणन विभागाचे प्रधान सचिव, पणन संचालक व शासनाच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे.- अनिल चव्हाण, सचिव,

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कोरोना योद्धा पुन्हा कर्तव्यावर बाजार समितीमधील सुरक्षा अधिकारी संजय तळेकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या आठ वर्षांच्या मुलीलाही लागण झाली होती. बाजार समिती प्रशासनाने या दोघांच्याही उपचाराची जबाबदारी स्वीकारली होती. दोघेही कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी तळेकर पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. यामुळे बाजार समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. बाजार समिती सचिव अनिल चव्हाण यांनी स्वत: फळ मार्केटमध्ये जाऊन तळेकर यांचे स्वागत केले.

२० मार्चपासून उपलब्ध साहित्य   साहित्य संख्याफेस मास्क १ लाख १५,८४०हॅन्ड सॅनिटायझर २०६२फेस स्प्रे ९७तापमान तपसणी ५ लाख १५ हजारहॅन्ड ग्लोव्हज ४६४९फेस शिल्ड १५०पीपीई किट्स २२

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस