शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

होळीला पुरणपोळीसह आमरसही ओरपा; ४९ हजार पेट्यांची आवक, हापूसचे दर नियंत्रणात

By नामदेव मोरे | Updated: March 19, 2024 11:53 IST

दरवर्षी गुढीपाडव्यापासून आंब्याची आवक वाढते पण यंदा होळीलाच मार्केट आंबामय होणार असल्याचे स्पष्ट

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी ४९ हजार पेट्यांची आवक झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये हापूस ३०० ते १ हजार रुपये डझन व किरकोळ मार्केटमध्ये ७०० ते १,८०० रुपये डझन दराने विकला जात आहे. यापुढे ही आवक वाढतच राहणार असल्यामुळे होळीला मुंबईकरांना मुबलक प्रमाणात आंब्याची चव चाखता येणार आहे.

प्रत्येक वर्षी गुढीपाडव्यापासून आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत असते. परंतु, या वर्षी होळीलाच मार्केट आंबामय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. किरकोळ मार्केटमध्ये ७०० ते १,८०० रुपये डझन दराने आंब्याची विक्री होत असली तरी यापुढे हे दरही कमी होण्यास सुरुवात होणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगडसह कर्नाटक, केरळ व आंध्र प्रदेशमधूनही आंब्याची आवक सुरू झाली आहे.

  • बाजार समितीमध्ये कोकणातून ३९ हजार ४२४ व इतर राज्यांतून ९,५७६ पेट्या अशी ४९ हजार पेट्यांची आवक झाली. आठवड्यापूर्वी आंबा ४०० ते १,१०० रुपये डझन दराने विकला जात होता.
  • हा दर १०० रुपयांनी घसरून ३०० ते हजारांवर आला. २० एप्रिलपर्यंत आवक वाढतच राहणार आहे. त्यामुळे  होळीच्या सणाला पोळीसोबत आमरसाचा आनंद यंदा खवैय्यांना घेता येणार आहे.

यावर्षी मार्च ते २० एप्रिलदरम्यान आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होणार आहे. आंब्याचे दर नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली आहे. हापूसही सामान्यांच्या आवाक्यात येणार असून, होळीला अनेकांना हापूसची चव चाखता येणार आहे. मे महिन्यामध्येही आंब्याची आवक चांगली होईल. हापूसबरोबर इतर राज्यांतील आंब्याची आवकही वाढण्यास सुरुवात झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.- संजय पानसरे, संचालक, बाजार समिती

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईHoliहोळी 2023Alphonso Mangoहापूस आंबा