शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मोकळ्या भूखंडावर झोपड्यांचे पेव

By admin | Updated: February 17, 2016 02:26 IST

नवीन पनवेल आणि खांदा वसाहतीत पनवेल-दिवा लोहमार्गालगतच्या मोकळ्या भूखंडावर दोन्ही बाजूने झोपड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

अरुणकुमार मेहत्रे, कळंबोलीनवीन पनवेल आणि खांदा वसाहतीत पनवेल-दिवा लोहमार्गालगतच्या मोकळ्या भूखंडावर दोन्ही बाजूने झोपड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या झोपड्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे मोठे आव्हान सिडकोसमोर उभे राहिले आहे. त्यामुळे या झोपड्या दिवसागणिक वाढत आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे सिडकोच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे.पनवेलनंतर झोपडपट्टीमाफियांनी नवीन पनवेल नोडकडे मोर्चा वळवला. खांदा वसाहतीतील सेंट जोसेफ हायस्कूलच्या समोर सेक्टर-१२ येथे राखीव मोकळा भूखंड आहे. त्याचबरोबर नवीन पनवेलला शबरी हॉटेलच्या पाठीमागे सिडकोची जागा आहे. पनवेल-दिवा लोहमार्गालगत असलेल्या या मोकळ्या जागेवर झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. पूर्वी मर्यादित असलेल्या या झोपड्यांच्या संख्येत आता वाढ झाली आहे. मतांवर डोळा ठेवून काही राजकीय मंडळींनी येथे राहणाऱ्यांची थेट मतदार यादीत नाव नोंदणी करून घेतली. तत्पूर्वी पॅन कार्ड, रेशन कार्डबरोबर आधार कार्ड सुद्धा तयार करून देण्यात आली आहेत. त्यानंतर या दोन्ही झोपडपट्ट्यांचे माता रमाईनगर आणि भीमनगर असे नामकरण करण्यात आले. झोपड्यांमध्ये मंदिर सुद्धा बांधण्यात आले आहे. याशिवाय झोपड्यांवर राजकीय पक्षांचे झेंडे तसेच बाहेर बॅनर लावण्यात आले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची वाहिनी फोडून झोपडपट्टीवासीय आपली तहान भागवत आहेत. त्याचबरोबर काही झोपड्यांमध्ये वीज सुद्धा पोहोचली आहे. पनवेल नगरपालिका या झोपड्यांध्ये सार्वजनिक शौचालये बांधण्याच्या तयारीत आहे. काही राजकीय व्यक्ती या ठिकाणी झोपड्या बांधून विकत असल्याची चर्चा सुद्धा सुरू आहे. या झोपडपट्टीवासीयांना दिवसाआड टँकर सुध्दा पाठवला जात आहे. या झोपडपट्टीवासीयांचा बाजूला असलेल्या रहिवासी संकुल, त्याचबरोबर शाळेला त्रास होत आहे. रात्री मद्यप्राशन करून दररोज वाद-विवाद, तंटे या ठिकाणी होतात. त्याचा रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. स्वच्छतेचा बोजवारासिडकोच्या मोकळ्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या झोपड्यांमुळे नवीन पनवेल नोडचे विद्रुपीकरण होत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी राहणारे झोपडपट्टीधारक उघड्यावर शौचास बसत असल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडत आहे. त्याचबरोबर दुर्गंधीसुद्धा पसरत आहे.अपघाताला निमंत्रणभीमनगर आणि माता रमाबाईनगर झोपडपट्टीत राहणारे लोक बिनधास्त पनवेल-दिवा लोहमार्ग ओलांडतात. अनेकदा मेल किंवा मालगाडी आल्याचे रात्रीच्या वेळी समजत नसल्याने अपघात होतात. असे काही प्रकार या ठिकाणी घडलेले आहेत.याशिवाय झोपडपट्टीधारक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची वाहिनी फोडून त्यातून पाणीचोरी करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. त्याचबरोबर जलवाहिनी फुटून अपघात होण्याची भीतीसुद्धा व्यक्त करण्यात येत आहेआम्ही अतिक्र मण आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाईला सुरुवात केली आहे. टप्प्याटप्प्याने अशा बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे. जर एखाद्या भूखंडावर अतिक्र मण करून झोपड्या उभारण्यात आल्या असतील तर त्या विरोधात सुद्धा मोहीम राबविण्यात येईल.- एस.जे. गोसावी, बांधकाम नियंत्रक, सिडको