कळंबोली : गिरवले गावात सार्वजनिक नळावर पाणी भरण्याच्या कारणावरून दोन दिवसांपूर्वी एका महिलेला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.भारती अनिल म्हात्रे या ग्रामपंचायतीच्या नळावर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आत्माराम हातमोडे, चेतन हातमोडे व प्रथमेश हातमोडे हे या ठिकाणी आले. तुम्ही आम्हाला मतदान केले नाही, त्यामुळे ग्रामपंचायतीच्या नळावर पाणी भरता येणार नाही असे सांगत भारती म्हात्रे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तक्रारदार महिलेने आम्ही पाणीपट्टी भरतो त्यामुळे पाणी भरणार असे उत्तर दिले. याचा राग येवून आत्माराम हातमोडे यांनी या महिलेला धक्काबुक्की व मारहाण केली. त्यावेळी चेतन आणि प्रथमेश याठिकाणी आले, त्यांनीही मारहाण केली. पुन्हा पाणी भरण्यास आल्यास गावात राहू देणार नाही अशी धमकी भारती म्हात्रे यांना देण्यात आली. याप्रकरणी म्हात्रे कुटुंबीयांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्र ार दिली असून गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी. सहाने पुढील तपास करीत आहेत.
गिरवलेत महिलेला मारहाण
By admin | Updated: May 27, 2016 02:28 IST