शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

हुक्का पार्लर पबसह ४१ हॉटेलच्या अतिक्रमणांवर हातोडा

By नामदेव मोरे | Updated: July 1, 2024 18:40 IST

पोलिसांसह महानगरपालिकेची मोहीम : रात्री दहा ते पहाटे ४ पर्यंत सुरू होती कारवाई

नवी मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नवी मुंबई महानगरपालिका व पोलिसांनी शहरातील हुक्का पार्लर, बार, पबच्या अतिक्रमणांवर धडक कारवाई सुरू केली आहे. रविवारी रात्री १० पासून पहाटे ४ वाजेपर्यंत शहराच्या विविध भागातील ४१ अतिक्रमणांवर हातोडा चालविण्यात आला. यामुळे अनधिकृत बांधकाम करणारांचे धाबे दणाणले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पदभार स्विकारल्यापासून शहरातील अतिक्रमणांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. झोपड्या, अनधिकृत इमारतीबरोबर हॉटेल चालकांच्या अतिक्रमणांवर कारवाई करून दंडही वसूल केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच अवैध व्यवसाय करणारांवर कारवाईचे आदेश दिले होते. यानंतर नवी मुंबईमधील हाॅटेल, बार, पब, लॉज, हुक्का पार्लरविरोधात पोलिस व महानगरपालिकेने संयुक्त मोहीम सुरू केली आहे. 

आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, उपायुक्त डा. राहूल गेठे यांनी रात्री दहा वाजता एकाच वेळी बेलापूर, नेरूळ, वाशी, ऐरोली व घणसोली विभागात मोहीम सुरू केली. अनेक हाॅटेल चालकांनी मार्जीनल स्पेसचा व्यवसायासाठी वापर सुरू केला होता. पावसाळी शेडच्या नावाखाली पक्के बांधकाम करून त्याचा व्यावसायीक वापर करण्यात येत होता. या सर्वांच्या अतिक्रमणांवर सरसकट कारवाई करण्यात आली.            पहाटे चार वाजेपर्यंत हॉटेल चालकांनी बांधलेले शेड, वाढीव बांधकाम काढून टाकण्यात आले. रात्री सुरू झालेल्या कारवाईमुळे अतिक्रमण करणारांचे धाबे दणाणले आहे. शहरातील हॉटेल चालकांची सर्व अतिक्रमणे हटवेपर्यंत मोहीम सुरूच ठेवली जाणार असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. कारवाई दरम्यान स्वत: आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, उपायुक्त डॉ. राहूल गेठे शहरभर भिरून कारवाईचा आढावा घेत होते. याशिवाय विभाग अधिकारी शशिकांत तांडेल, डॉ. अमोल पालवे, सागर मोरे, सुनिल काठोळे, संजय तायडे, अशोक आहिरेही रात्रीभर कारवाईवर लक्ष ठेवून होते.

नवी मुंबईमधील हॉटेलसह सर्व प्रकारच्या अतिक्रमणांविरोधात नियमीत कारवाई केली जात आहे. रविवारी रात्री बेलापूर ते ऐरोली दरम्यान ४१ हॉटेल, पब, हुक्कापार्लरव कारवाई केली असून ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे.- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त महानगरपालिका

महानगरपालिका व पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल, बारच्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे. कारवाईसाठी आवश्यक तो बंदोबस्त पुरविण्यात येत आहे.- पंकज डहाणे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १

कारवाई करण्यात आलेली हॉटेलबेलापूर विभागव्हीआयपी बारधूम नाईटनाईट ॲंगलकबानाबेबोस्टार नाईटलक्ष्मी हॉटेल,महेश हॉटेलअश्विथ हॉटेलस्पाईस ऑफ शेडघाटी अड्डाब्रु हाऊस कॅफेरूड लॉन्चनिमंत्रण हॉटेलबहाणाकॅफे नाईटिनबार मिनिस्ट्रीबार स्टॉक एक्सचेंजनॉर्दन स्पाइसेसकॉफी बाय डी बेलादि लव्ह ॲंड लाटेसुवर्डस कॅफेमालवण तडका

नेरूळ विभागसाई दरबार हॉटेलभारती बारगंगासागर जॉलसिल्व्हर पॅलेस कॅफेशानदार हुक्का पार्लर शिरवणेसत्यम लॉज शिरवणे

वाशी विभागहॉटेल गोल्डन सुट्सटेरेझा वाशी प्लाझाअंबर रेस्टॉरंट

कोपरखैरणे विभागआदर्श बार सेक्टर १ ए

घणसोली विभागएमएच ४३ रेस्टॉरंट ॲंड बारमोनार्क रेस्टॉरंट व बारसीएनपी पंपावरील अनधिकृत होर्डींगमल्लीका बार व रेस्टॉरंटमिडलँड हॉटेल रेस्टॉरंट

ऐरोली विभागसेक्टर १ मधील अनधिकृ शेडऐरोली नाक्यावरील चायनीस हॉटेलचे अतिक्रमणसेक्टर १९ मधील कृष्णा हॉटेल 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई