शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

एसटी आरक्षणातील निम्मेच पैसे परत, प्रवाशांमध्ये नाराजी, कर्मचा-यांबरोबर वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 02:49 IST

एसटी कामगारांच्या संपामुळे दिवाळीत गावाला जाण्यासाठी आरक्षण केलेल्यांना गावाला जाता आले नाही. हे आरक्षण रद्द करण्यासाठी रविवारी गर्दी झाली होती;

पनवेल : एसटी कामगारांच्या संपामुळे दिवाळीत गावाला जाण्यासाठी आरक्षण केलेल्यांना गावाला जाता आले नाही. हे आरक्षण रद्द करण्यासाठी रविवारी गर्दी झाली होती; पण परतीचे आरक्षण केलेल्या प्रवाशांना ५० टक्के परतावा मिळेल, असे सांगण्यात आल्याने प्रवासी व कर्मचाºयांमध्ये वाद निर्माण झाले. प्रवास न करताच पैसे बुडणार असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.दिवाळीत शाळांना व कार्यालयांना सुट्टी असल्याने अनेक कुटुंबे प्रवासाचे बेत करतात. कोण कुटुंबासह गावाला जातात, तर कोणी फिरायला जातात. या वेळी गाड्यांना गर्दी असल्याने अनेक जण आरक्षण करताना परतीच्या प्रवासाचेही आरक्षण करतात. १७ ते २० आॅक्टोबर दरम्यान एसटी कामगारांच्या संपामुळे अनेकांना सुट्टी असूनही प्रवास करता आला नाही. त्यामुळे आधीच हैराण झालेल्या प्रवाशांनी संप मिटल्यावर शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने आरक्षण तिकिटाचा परतावा घेण्यासाठी एसटी स्थानकात गर्दी केली होती.आरक्षण परतावा देताना ४ दिवस ज्या गाड्या सुटल्या नाहीत त्याचा पूर्ण परतावा दिला जात होता; पण ज्यांचे परतीचे तिकीट रविवारचे होते त्यांना केवळ ५० टक्के परतावा दिला जात होता. त्यामुळे वाद निर्माण होत होते. एसटीच्या संगणकातील सॉफ्टवेअरमध्ये गाडी सुटली नाही तरच पैसे परत देण्याची तरतूद आहे. रविवारी गाडी सुटल्याने पूर्ण पैसे देता येत नसल्याचे कर्मचारी सांगत होते. आगारप्रमुखांना त्याबाबत प्रशासनाने कोणत्याही सूचना दिल्या नसल्याने हजारो रुपये बुडणार म्हणून प्रवासी नाराजी व्यक्त करीत होते.>१९ आॅक्टोबर रोजी मुंबई-कळंब गाडीचे जाण्यासाठी व रविवार २२ आॅक्टोबरचे परतीचे आरक्षण केले होते. एसटीच्या संपामुळे गावी जाता आले नाही. रविवारी आरक्षण रद्द करून परतावा घेण्यासाठी गेले असता, परतीचे आरक्षण आजचे असल्याने ५० टक्केच पैसे परत मिळतील, असे सांगण्यात आले. कळंबच्या तीन आरक्षित तिकिटासाठी २१०० रु पये आहेत. आमचे सगळे पैसे मिळायला हवेत.- वैजयंती शितळे, प्रवासी>संगणकातील सॉफ्टवेअरमुळे काही प्रॉब्लेम येत असतील, तर त्यामध्ये दुरुस्ती केली जाईल. परतीचे आरक्षण केलेल्यांना तिकिटाचे पूर्ण पैसे परत मिळतील.- रंजितसिंह देओल, व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ

टॅग्स :ST Strikeएसटी संप