शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

घारापुरी बेटावरील २५ स्थानिक लघुउद्योजकांवर उपासमारीचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 04:11 IST

घारापुरी बेटावर पर्यटनावर आधारित व्यवसाय करण्यासाठी उभारण्यात आलेली गरीब-गरजूंच्या टपऱ्या, दुकाने मेरिटाइम बोर्डाने अनधिकृत ठरवल्या आहेत

उरण - घारापुरी बेटावर पर्यटनावर आधारित व्यवसाय करण्यासाठी उभारण्यात आलेली गरीब-गरजूंच्या टपऱ्या, दुकाने मेरिटाइम बोर्डाने अनधिकृत ठरवल्या आहेत आणि कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे पर्यटनावर व्यवसाय करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाºया जवळपास २५ स्थानिक लघुउद्योजकांवर उपासमारीचे संकट येऊ घातले आहे.स्थानिक ग्रामस्थांना कायमस्वरूपी दुकाने भाडेतत्त्वावर सुशोभित करून देण्याची मागणी याआधीच सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मेरिटाइम बोर्डाला दिलेल्या प्रस्तावातून केली होती. त्यानंतर मंगळवारी त्रिमूर्ती लघुउद्योजक सामाजिक संस्थेच्या पदाधिकाºयांनी मागील अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाºया स्थानिक भूमिपुत्रांना सुशोभित दुकाने जोपर्यंत दिली जात नाहीत तोपर्यंत सदर दुकानांवर कारवाई करण्यात येऊ नये, अशी विनंती रायगड जिल्हाधिकाºयांंकडे केली. जिल्हाधिकाºयांनीही याबाबत संबंधित अधिकाºयांसोबत बैठक बोलावून घारापुरी येथील दुकानदारांना न्याय मिळेल, असे आश्वासन दिले आहे.घारापुरी बेट जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ आहे. शेतबंदर जेट्टीपासून ते लेण्यांच्या पायथ्यापर्यंत मेरिटाइम बोर्डाच्या जागेत सुमारे ५० छोटी-मोठी दुकाने आहेत. यामध्ये चणे-फुटाणे, मका, टोप्या आदी अत्यंत गरीब-गरजू विक्रे त्या दुकानदारांचा समावेश आहे. पर्यटनावर आधारित व्यवसाय करणाºया स्थानिक व्यावसायिकांना मेरिटाइम बोर्डाने कायमस्वरूपी दुकाने सुशोभित करून भाडेतत्त्वावर देण्यात यावीत असा प्रस्ताव खासदार श्रीरंग बारणे यांनी दिला होता. या प्रस्तावाला मेरिटाइम बोर्डानेही होकार दर्शविला होता. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर राजकीय हस्तक्षेपामुळे मेरिटाइम बोर्डाने भूमिका बदलली असून भूमिपुत्रांची दुकाने अनधिकृत ठरवली आहे.

टॅग्स :Raigadरायगड