शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

"जीएसटी म्हणजे गुड अँड सिंपल टॅक्स"; सीए विमल जैन यांनी सांगितले GST चे सामान्यांशी नाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 19:11 IST

ICAI च्या नवी मुंबई शाखेच्या बैठकीत पदाधिकारी, तज्ज्ञांकडून सदस्यांना विशेष मार्गदर्शन

वाशी, नवी मुंबई: GST ही क्लिष्ट प्रकारची करप्रणाली नसून ती अतिशय सहज आणि सोपी करप्रणाली आहे. GST म्हणजे Good & Simple Tax असे म्हणता येईल. जीएसटी कौन्सिल वेळोवेळी विविध बदल आणि कायद्यांतील सुधारणा सुचवत असते. या बदलाने सीए प्रोफेशनल लोकांना थोडे जास्त श्रम पडतात. पण तसे असले तरी या सुधारणा देशाच्या जडणघडणीसाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाच्या असतात. जीएसी करप्रणाली क्लिष्ट आहे असे तेच लोक म्हणतात ज्यांना करचोरी करणं हा उद्देश असतो. पण जे नित्यनेमाने योग्य पद्धतीने आपले व्यवहार करतात, त्यांच्यासाठी जीएसटी म्हणजे सरळ आणि सोपी पद्धत आहे, अशा शब्दांत सीए बिमल जैन यांनी आज (४ नोव्हेंबर) उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन केले.

सीए विमल पुनमिया आणि सीए विजय मंत्री यांनीही आजच्या कार्यक्रमात सदस्यांना खास विषयांवर मार्गदर्शन केले. कॅपिटल मार्केटचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होत असलेला परिणाम, देशात आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये कॅपिटल मार्केट कशा प्रकारची भूमिका बजावेल याबाबत विजय मंत्री यांनी मार्गदर्शन केले. याशिवाय, सीए विमल पुनमिया यांनी मृत्यूपत्र, नॉमिनेशन मधील तांत्रिक बाबी आणि वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचे हक्क या विषयावर माहिती दिली. प्रत्येक स्थितीत कोणत्या व्यक्तीचे काय अधिकार असू शकतात यावर त्यांनी मार्गदर्शन केले आणि सभासद सदस्यांच्या अडचणींचे निवारण केले.

फोटोमध्ये (डावीकडून) वेस्टर्न रिजनचे सचिव सौरभ अजमेरा, चेअरमन अर्पित काबरा, नवी मुंबई शाखेचे चेअरमन हर्षल अजमेरा

भारतीय चार्टर्ड अकाऊंटंट संघटनेचा (The institute of chartered accountants of india) म्हणजेच ICAI च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम शनिवारी, ४ नोव्हेंबरला नवी मुंबईत पार पडला. वाशीच्या तुंगा हॉटेलमध्ये नवी मुंबई शाखेच्या वतीने WIRC च्या सर्व सभासद-सदस्यांची पदाधिकाऱ्यांशी एक बैठक झाली. वेस्टर्न रिजनचे चेअरमन अर्पित काबरा, सचिव सौरभ अजमेरा, खजिनदार केतन सैया, नवी मुंबई शाखेचे चेअरमन हर्षल अजमेरा, उपाध्यक्ष निलेश बजाज, ब्रँच नॉमिनी संजय निकम या सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. ठराविक कालावधीच्या अंतराने हे संघटनेचे पदाधिकारी विविध शाखांच्या सदस्यांची भेट घेत असतात आणि त्यांच्या समस्यांचे निवारण करत त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. आजदेखील नवी मुंबईतील बैठकीत दोनही शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित मिळून आपल्या संघटनेच्या नवी मुंबई शाखेच्या सदस्यांशी संवाद साधला आणि त्यांने नव्या बदलांबाबत तसेच नियमांबाबत मार्गदर्शन केले.

टॅग्स :chartered accountantसीएNavi Mumbaiनवी मुंबई