शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

पावसाने बहरल्या रोपवाटिका

By admin | Updated: June 22, 2016 02:09 IST

वर्षा ऋतूचा खऱ्या अर्थाने प्रारंभ झाल्याची झलक दोन दिवस पडलेल्या मृगाच्या सरींमुळे दिसून आली. ज्या ठिकाणी भातपेरणी झाली तेथे पावसामुळे भाताच्या नर्सरी रोपांनी आपले अस्तित्व दाखवित

पेण : वर्षा ऋतूचा खऱ्या अर्थाने प्रारंभ झाल्याची झलक दोन दिवस पडलेल्या मृगाच्या सरींमुळे दिसून आली. ज्या ठिकाणी भातपेरणी झाली तेथे पावसामुळे भाताच्या नर्सरी रोपांनी आपले अस्तित्व दाखवित बळीराजाला आनंदाची वार्ता दिली. यामुळे सगळीकडे भात रोपांचे हिरवे गालिचे पसरल्याचे दिसून येत आहेत. पेणच्या १३ लाख १०० हेक्टर लागवडी क्षेत्रावरील ५० टक्के रोपवाटिकांनी आपले अस्तित्व दाखवले आहे. पुढच्या नक्षत्रांच्या रेलचेलीने सबंध शिवारात हिरवा गालिचा पसरुन पीक डोलू लागणार आहे. रायगडमधील एक लाख बारा हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती लागवड होणार आहे. पेणच्या शिवारात सुपीक लालबुंद मातीत भाताची नर्सरी रोपे आता शेतकऱ्यांसह सर्वांनाच खुणावत आहेत. तब्बल २० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मृगाच्या अंतिम टप्प्यात मान्सून राज्यभरात दाखल झाला. हवामानशास्त्र विभागाचे सर्व अंदाज फोल ठरवत थाटात मान्सूनची एण्ट्री झाली. परंतु जीव टांगणीला लागलेला बळीराजा मात्र चिंतातुर होता. मृगाची पाऊसधारा कधी एकदा पडते या प्रतीक्षेची अखेर होऊन पाऊस मनसोक्त पडला. धरणी ओलीचिंब झाली, अंकुरलेले दाणे या पावसाने अलगद वर आले. यासाठी पौर्णिमेच्या उधाणभरतीची वाट पहावी लागली. गतवर्षी पाऊस न पडल्याने तप्त झालेल्या धरणीला सुध्दा चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करावी लागते. शेवटी सृजनसृष्टीच्या नवचैतन्याचे मधुर मिलनातून नवी पहाट व उन्नती होते. भाताचे अमाप कोठार असलेल्या रायगड जिल्ह्याच्या शिवारात पावसाच्या पाण्यावरची शेती आता टिकणार; शेतामध्ये भाताचे मातीपासून तयार केलेले वाफे त्यात हिरव्या तृणांकुरांनी जन्म घेतल्याने या गोंडस व मनमोहक हिरव्या पुंजवयानी आता वाटसरुंचे लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे. पेणच्या मुंबई - गोवा महामार्गालगतची शेती व पेण - खोपोली राज्य मार्गालगतच्या शेतात या हिरव्या - हिरव्या गालिच्यांचे सुरेख रंग प्रत्येकाचे मन आकर्षित करते. थोड्या अवधीत या शेतामध्ये सुगीची रेलचेल दिसणार आहे, अन् खरीप हंगामातील श्रमिकांची महिनाभर लावणीची कामे चालणार आहे. (वार्ताहर)