शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजी कायम, पक्षामध्ये दोन गट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:02 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे.

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. मुख्य कार्यकारिणी व युवक काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसू लागला आहे. दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप केला आहे.उपमहापौर निवडणुकीच्या दरम्यान नवी मुंबई काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले आहेत. यानंतर जिल्हा कार्यकारिणीची निवड व शहरातील पदाधिकाºयांच्या नियुक्त्यांनंतरही गटबाजी सुरूच आहे. जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक व इतर पदाधिकारी यांचा एक गट असून दुसरीकडे माजी जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत असे दोन गट तयार झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्येही दोन्ही गटांकडून स्वतंत्रपणे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू आहे. युवक काँगे्रसचे ठाणे लोकसभा मतदार संघ कार्यक्षेत्राचे अध्यक्ष निशांत भगत यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेवून चलो घर- घर अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. शहरातील काँग्रेसच्या मुख्य कार्यकारिणीच्या पदाधिकाºयांकडून युवक काँग्रेसला डावलण्यात येत आहे. विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप भगत यांनी केला. ठाणे लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांचा प्रचार करण्यासाठी काँग्रेस युवकांच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी जाऊन काँग्रेसच्या योजनांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. यावेळीकाँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, विजय वाळुंज, सिद्धार्थ अवधूत, मयूर जैसवाल आदी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.काँगे्रसमधील या गटबाजीचा आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना दोन्ही गटांशी समन्वय साधण्याची कसरत करावी लागणार आहे.>नवी मुंबई काँग्रेसमध्ये मतभेद नाहीत, युवक अध्यक्षांना फोन केले असता कधीही फोन घेत नाहीत. निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात कधी विचारपूस करत नाहीत. कार्यक्र मांबाबत माहिती देत नाहीत व बोलावतही नाहीत.- अनिल कौशिक, अध्यक्ष,नवी मुंबई जिल्हाकाँगे्रस कमिटी>मुख्य कार्यकारिणीकडून युवकच्या पदाधिकाºयांना विश्वासात घेतले जात नाही. वारंवार डावलले जात असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.- निशांत भगत,अध्यक्ष, युवक काँगे्रस