शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
5
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
6
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
7
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
8
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
9
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
10
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
11
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
12
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
13
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
14
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
15
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
16
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
17
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
18
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
19
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
20
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी

सरकारच्या बेफिकिरीचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2016 02:07 IST

सरकारी गोदामांची कमी संख्या आणि खासगी संस्थांच्या गोदामांचे न परवडणारे दर अशा दुहेरी कारणामुळे जिल्ह्यात भात खरेदी उशिरा सुरू झाली.

आविष्कार देसाई,  अलिबागसरकारी गोदामांची कमी संख्या आणि खासगी संस्थांच्या गोदामांचे न परवडणारे दर अशा दुहेरी कारणामुळे जिल्ह्यात भात खरेदी उशिरा सुरू झाली. परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत भात खरेदीचे प्रमाण यंदा खाली येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सरकारच्या या बेफिकिरीचा थेट आर्थिक फटका जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये एक लाख सात हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली होती. त्या माध्यमातून दोन हजार ८८४ प्रति हेक्टर भाताचे उत्पादन झाले. सरकारने यंदा सर्वसाधारण भाताला एक हजार ४१० रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर केला. यंदा भाताचे उत्पादन तीन लाख आठ हजार ५८० क्विंटल झाले आहे. सरकारने भाताला प्रतिक्विंटल एक हजार ४१० रुपये दर दिला असल्याने ४३ कोटी ५० लाख ९७ हजार ८०० रुपयांचा भात पणन विभाग खरेदी करू शकणार आहे.गेल्या वर्षी एक लाख १४ हजार हेक्टर क्षेत्रामधून दोन हजार ७९२ प्रतिक्विंटल भाताचे उत्पादन झाले होते. त्यावेळी एक हजार ३१० अधिक २०० रुपये बोनस असा दर दिला होता. ८४ हजार क्लिंटल भाताची खरेदी पणन विभागाने केली होती, ज्याची किंमत ४८ कोटींच्या घरात होती.यंदा भाताची खरेदी दोन महिने उशिरा सुरू झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी तो बाजारात विकला आहे. ज्या ठिकाणी भात खरेदी केंद्र नाही तेथील शेतकरीही सरकारने दिलेल्या दराला मुकणार आहेत. जिल्ह्यात सध्या कर्जत तालुक्यातील लाडीवली, कळंब येथेच भात खरेदी केंद्रे पणन विभागाने सुरू केली आहेत. कर्जतमध्ये आणखीन दोन, पाली तीन, पोलादपूर आणि पेण येथे प्रत्येकी एक केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे पणन विभागाने सांगितले. सरकारी गोदामांची संख्या अपुरी आहे, त्याचप्रमाणे खासगी गोदामांचे दर परवडत नाही. त्यामुळे भात खरेदीला उशीर झाला ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. परंतु काही शेतकऱ्यांकडे भात असेल ते विकू शकतात तसेच पाली, रोहे, मुरुड आणि माणगाव या तालुक्यांतील शेतकरी उन्हाळी भातशेती करतात. त्यांना याचा लाभ घेता येईल. यंदा ४० हजार क्विंटल भाताची खरेदी होण्याची शक्यता आहे.- भारतभूषण पाटील, जिल्हा पणन अधिकारी, रायगड