शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
3
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
4
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
5
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
6
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
7
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
8
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
9
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
10
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
11
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
12
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
13
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
14
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
15
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
16
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
17
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
18
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
19
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
20
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क

हुक्क्यावरून शासकीय यंत्रणेत टोलवाटोलवी

By admin | Updated: June 3, 2017 06:41 IST

हुक्का पार्लरचा परवाना व कारवाईचे अधिकार यावरून शासकीय यंत्रणेचा संभ्रम दिसून येत आहे. कायदा व सुव्यवस्थेचा

सूर्यकांत वाघमारे/लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : हुक्का पार्लरचा परवाना व कारवाईचे अधिकार यावरून शासकीय यंत्रणेचा संभ्रम दिसून येत आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांना कारवाईचे अधिकार आहेत; परंतु हुक्क्यात तंबाखूचे प्रमाण किती असावे व किती वापरले जात आहे? हे तपासणारी यंत्रणाच नसल्याचे दिसून येत आहे.वाढत्या हुक्का पार्लरमुळे शहराच्या संस्कृतीला गालबोट लागत चालले आहे. तर हुक्क्यासाठी रात्री-अपरात्री घराबाहेर निघणाऱ्या तरुणांवरही कुटुंबाचे नियंत्रण राहिले नसल्याचे दिसत आहे. दहा वर्षांपूर्वी डान्सबारच्या आहारी गेल्याने तरुणांची झालेली अवस्था, पुन्हा हुक्का पार्लरच्या माध्यमातून उद्ध्वस्त होताना पाहायला मिळत आहे. सध्या नवी मुंबईसह, पुणे व मुंबईसारख्या शहरांमध्ये हुक्का पार्लरचे प्रमाण वाढत आहे. चित्रपटांचा प्रभाव असलेले तरुण लाइफस्टाइल म्हणून त्याकडे वळत आहेत. काहींनी तर हुक्का पिणे हा नित्य नियमित कार्यक्रमच केला आहे. हुक्का पिल्यानंतर हे तरुण रात्री-अपरात्री गटाने फिरत असल्यामुळे शहरात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. याला आळा घालण्यासाठी शहरातील हुक्का पार्लरवर बंदीची मागणी होत आहे; परंतु हुक्का पार्लरवर कारवाई करायची कोणी? यावरून शासकीय यंत्रणेतच संभ्रम अवस्था असल्याचे दिसून येत आहे.शहरात अवैधरीत्या हुक्का पार्लर सुरू असल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर शासकीय यंत्रणेतील हा सावळा गोंधळ समोर आला आहे. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत, नवी मुंबई पोलिसांनी एकाच दिवसात २८हून अधिक हुक्का पार्लरवर कारवाई केली आहे; परंतु काहींनी शासकीय यंत्रणेत ‘वरपर्यंतची पोच’ वापरून पोलिसांना न जुमानता हुक्का पार्लर सुरूच ठेवले आहेत. यामुळे हुक्का पार्लरवर ठोस कारवाईसाठी ठोस कायद्याची आवश्यकता भासत आहे. याकरिता राज्य सरकार प्रयत्नशील असून, तो कायदा लवकरच अमलात येणार असल्याचेही सूत्रांकडून समजते. हुक्का पार्लर चालविण्यासाठी परवानाच नसल्यामुळे अनेकांनी स्मोकिंग झोनच्या नावाखाली ते सुरू केले आहेत. त्याकरिता पालिकेचा हॉटेल परवाना घेऊन त्याचाही गैरवापर होत आहे. असाच प्रकार सतरा प्लाझामध्ये निदर्शनास आल्यानंतर पालिकेच्या परवाना विभागाने दहा महिन्यांपूर्वी एक कारवाईही केलेली आहे. त्यामुळे हॉटेल परवान्यांचा योग्य वापर होतोय का? हेदेखील पडताळण्याची आवश्यकता आहे. बहुतेक ठिकाणी हुक्क्यामध्ये तंबाखूऐवजी फ्लेवर असल्याचे भासवले जात आहे; परंतु फक्त फ्लेवरसाठी तरुण-तरुणी चोरी छुपे रात्री-अपरात्री घराबाहेर निघण्याची शक्यता कमी आहे. यामुळे हुक्क्याच्या आडून नशा होत असल्याची दाट शक्यता असल्याने हुक्क्यातील तंबाखूचे प्रमाण तपासण्याच्या यंत्रणेची गरज आहे. अन्न व औषध प्रशासन, पोलीस व स्थानिक प्राधिकरण या तीनही यंत्रणांचे हुक्का पार्लवर नियंत्रण गरजेचे आहे. हुक्क्यासाठी परवाना नसल्याने पालिकेचा हॉटेल परवाना घेऊन ते चालवले जात आहेत. यामुळे पालिकेकडूनही परवान्याची पडताळणी होणे आवश्यक आहे. तर अशा ठिकाणी शरीरास अपायकारक पदार्थांचा वापर होतोय का? हे अन्न व औषध प्रशासनाने तपासणे गरजेचे आहे.