शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या तिजोरीत पडणार ६५ लाखांची भर, पोलिस बंदोबस्तामधून मिळणार शुल्क 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 10:05 IST

कार्यक्रमासाठी ८०० ते हजार पोलिस बंदोबस्त पुरवला जाणार आहे.

नवी मुंबई : नेरूळमध्ये होणार असलेल्या कोल्ड प्ले आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत ६० ते ६५ लाखांची भर पडणार आहे. कार्यक्रमासाठी ८०० ते हजार पोलिस बंदोबस्त पुरवला जाणार आहे. हा बंदोबस्त सशुल्क असल्याने त्या माध्यमातून शासनाला हे शुल्क मिळणार आहे. 

नेरूळ येथे डी. वाय. पाटील स्टेडियमवर १८, १९ व २१ जानेवारीला ‘कोल्ड प्ले’ या आंतरराष्ट्रीय बँडचा आवाज घुमणार आहे. बँडचा प्रत्यक्षात अनुभव घेण्यासाठी शौकिनांचे नवी मुंबईला पाय लागणार आहेत. त्यात देशभरातील तसेच देशाबाहेरून येणाऱ्यांचीही संख्या मोठी असणार आहे.  पोलिसांवर कायदा सुव्यवस्था राखण्याचाही ताण राहणार आहे. त्याशिवाय सर्व प्रकारच्या आपत्कालीन यंत्रणादेखील सज्ज ठेवल्या जाणार आहेत. 

खासगी कार्यक्रम गर्दी नियंत्रित राखण्यासह तिकिटांचा काळाबाजार रोखणे, चोरट्यांना आवर घालणे, वाहतूक सुरळीत राखणे, अशा अनेक प्रसंगांना पुढील तीन दिवस पोलिसांना सामोरे जावे लागणार आहे. तर होणारा कार्यक्रम खासगी असल्याने त्यासाठी पुरवला जाणारा पोलिस बंदोबस्त हा सशुल्क असणार आहे.

प्रतिदिन ५० हजार प्रेक्षक तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला प्रतिदिन ५० हजारांच्या जवळपास शौकिनांची वर्णी लागणार आहे. त्यात काही मंत्री, त्यांचे कुटुंबीय तसेच गर्भश्रीमंतांची मुलेदेखील असणार आहेत. ५० हजार ते अडीच, तीन लाखांना तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याच्याही चर्चा आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई