शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

गुडन्यूज... आवास योजनेच्या घरांच्या किमती होणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 08:39 IST

अर्जदारांच्या मागणीनुसार सिडकोकडून चाचपणी

कमलाकर कांबळे

नवी मुंबई : उलवे नोडमधील खारकोपर आणि बामणडोंगरी रेल्वे स्थानकाच्या परिसरात उभारलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या घरांची किंमत कमी करण्याचा निर्णय घेऊन, त्यानुसार सिडकोने चाचपणी सुरू केली आहे. अर्जदारांच्या मागणीनुसार ही चाचपणी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.दिवाळीच्या मुहूर्तावर सिडकोने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी  खारकोपर आणि बामणडोंगरी रेल्वे स्थानकाच्या परिसरात ७,८४९  घरांची योजना जाहीर करून, फेब्रुवारी, २०२३ मध्ये संगणकीय सोडत काढली, परंतु पाच महिने उलटले, तरी अर्जदारांना अद्याप घरांचे इरादापत्र  दिलेले नाही. त्यामुळे अर्जदारांत संभ्रमाचे वातावरण आहे. मुळात सिडकोच्या या घरांच्या किमती जास्त असल्याच्या अर्जदारांच्या तक्रारी आहेत.

n पंतप्रधान आवास योजनेसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा तीन लाखांची आहे, परंतु सिडकोच्या घरांची किमत  ३५ लाख रुपये इतकी आहे. n तीन लाख वार्षिक उत्पन्न मर्यादा असलेल्यांना कोणतीही बँक कर्ज देण्यास तयार नाही. त्यामुळे घरांच्या किमती कमी कराव्यात, अशी  मागणी अर्जदारांनी केली आहे.  n या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नगरविकास विभागालाही पत्र दिले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सिडकोने घराच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी सांगितले.

...म्हणूनच इरादापत्र देण्यास विलंबपंतप्रधान आवास योजनेंतर्गत उलवे नोडमध्ये घरांची किंमत किती कमी करायची, याचे धोरण संबंधित विभाग तयार करीत आहे. त्यामुळेच योजनेतील अर्जदारांना अद्याप इरादापत्र दिले नसल्याचे समजते, परंतु या संदर्भात सिडकोने कोणतीही माहिती दिली नसल्याने, त्यांच्यात संभ्रमाचे वातावरण आहे.

उत्पन्न मर्यादा वाढविल्याने नवा पेचमुंबई महानगर क्षेत्र अर्थात, एमएमआरमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार, आता ही उत्पन्न मर्यादा तीन लाखांहून सहा लाख रुपये केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र शासनाकडे विनंती केली होती. त्यानुसार, आता उत्पन्न मर्यादा वाढल्याने घरांच्या किमती कमी करण्यासाठी कोणते निकष लावायचे, असा नवा पेच आता सिडकोसमोर निर्माण झाला आहे. 

टॅग्स :MumbaiमुंबईcidcoसिडकोPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना