शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर! आवास योजनेतील घरांच्या किमती होणार कमी; ग्राहकांचे निर्णयाकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 07:15 IST

‘सिडको’चा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

कमलाकर कांबळेनवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून खारकोपर आणि बामणडोंगरी रेल्वे स्थानकांच्या परिसरात उभारलेल्या घरांच्या  किमती कमी करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करून अंतिम मान्यतेसाठी तो मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविला आहे. या प्रस्तावावर  दिवाळीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक निर्णय घेतील, असे सिडकोसह या प्रकल्पातील यशस्वी ग्राहकांना वाटत आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर सिडकोने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी  खारकोपर आणि बामणडोंगरी रेल्वे स्थानकांच्या परिसरात ७८४९ घरांची योजना जाहीर केली होती. 

अर्जदारांत संभ्रमाचे वातावरण या योजनेची फेब्रुवारी २०२३ मध्ये संगणकीय सोडत काढण्यात आली. परंतु, वर्ष उलटले तरी यशस्वी अर्जदारांना अद्याप घरांचे वाटपपत्र दिले गेले नाही. त्यामुळे अर्जदारांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. उलवे येथील सिडकोच्या या घरांच्या किमती जास्त असल्याच्या अर्जदारांच्या तक्रारी आहेत. पंतप्रधान आवास योजनेसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा तीन लाखांची आहे. मात्र, सिडकोने जाहीर केलेल्या या योजनेतील घराची किंमत जवळपास ३५ लाख रुपये इतकी आहे. याच परिसरात खासगी प्रकल्पातील घरेही सिडकोच्या तुलनेत स्वस्त आहेत. 

...म्हणूनच इरादापत्रांचे वाटप लांबलेपंतप्रधान आवास योजनेंतर्गत उलवे नोडमध्ये घरांच्या किमती कमी करण्याच्या दृष्टीने सिडकोच्या संबंधित विभागाकडून मागील काही महिन्यांपासून प्रस्ताव तयार केला जात होता. त्यानुसार किमती किती प्रमाणात कमी करायच्या याविषयीचे अभ्यासपूर्ण धोरण तयार करण्यात आले आहे. ही प्रक्रिया काहीशी किचकट आणि तितकीच तांत्रिक असल्यानेच या योजनेत यशस्वी ठरलेल्या अर्जदारांना अद्याप इरादापत्र दिले गेले नसल्याचे समजते.

...म्हणूनच इरादापत्रांचे वाटप लांबलेपंतप्रधान आवास योजनेंतर्गत उलवे नोडमध्ये घरांच्या किमती कमी करण्याच्या दृष्टीने सिडकोच्या संबंधित विभागाकडून मागील काही महिन्यांपासून प्रस्ताव तयार केला जात होता. त्यानुसार किमती किती प्रमाणात कमी करायच्या याविषयीचे अभ्यासपूर्ण धोरण तयार करण्यात आले आहे. ही प्रक्रिया काहीशी किचकट आणि तितकीच तांत्रिक असल्यानेच या योजनेत यशस्वी ठरलेल्या अर्जदारांना अद्याप इरादापत्र दिले गेले नसल्याचे समजते.

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबईEknath Shindeएकनाथ शिंदे