शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या शिल्लक घरांनाही ग्राहकांकडून चांगली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 00:11 IST

सिडकोच्या वतीने आॅगस्ट महिन्यात जाहिर करण्यात आलेल्या १४८३८ घरांपैकी विक्री न झालेले ११00 घरे शिल्लक आहेत. या घरांची ताबडतोब विक्री करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.

नवी मुंबई : सिडकोच्या वतीने आॅगस्ट महिन्यात जाहिर करण्यात आलेल्या १४८३८ घरांपैकी विक्री न झालेले ११00 घरे शिल्लक आहेत. या घरांची ताबडतोब विक्री करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार मंगळवारपासून या शिल्लक घरांसाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. या शिल्लक घरांसाठी तीन दिवसांत ५३00 अर्जदारांनी अर्ज केले आहेत. तर ११३0 ग्राहकांनी अनामत रकमेचा भरणाही केला आहे. यावरून सिडकोच्या घरांसाठी प्रतिक्षा यादी मोठी असल्याचे दिसून आले आहे.आॅगस्ट महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी १४८३८ घरांच्या गृहयोजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. या योजनेला राज्यभरातील ग्राहकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. १४८३८ घरांसाठी सुमारे दोन लाख अर्ज दाखल झाले होते. यातील पात्र दर्जदारांची आॅक्टोबर महिन्यात संगणकीय सोडत काढण्यात आली. यात यशस्वी झालेल्या अर्जदारांच्या कादपत्रांची छाननी व इतर प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत.असे असले तरी १४८३४ पैकी तब्बल ११00 घरे विक्रीविना पडून आहेत. यातील बहुतांशी घरे तळोजा आणि द्रोणागिरी नोडमध्ये आहेत. त्यामुळे या शिल्लक घरांची सुध्दा विक्री करण्याचा निर्णय सिडकोने घेतला. त्यानुसार मंगळवारी सिडकोच्या मुंबईतील निर्मल कार्यालयात अकराशे घरांसाठी आॅनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली.पहिल्या सोडतीत संधी हुकलेल्यांना ही सुवर्ण संधी असल्याने मागील तीन दिवसांपासून ग्राहकांनी ५३00 अर्ज भरले आहेत. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारीपर्यंत असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता सिडकोच्या संबधित विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, शिल्लक घरांसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाची फेब्रुवारी महिन्यात सोडत काढली जाणार आहे.

टॅग्स :cidcoसिडको