शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Good Bye 2019 : नववर्षाच्या स्वागतासाठी पनवेलमधील सुकापुरात अनोखा  देखावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 20:03 IST

31 डिसेंबर आणि नववर्षाचे स्वागत म्हटले की पार्ट्यांचा बेत, फूल ऑन सेलिब्रेशन, मनोरंजन आदींची जणू फॅशनच झाली आहे.

वैभव गायकरपनवेल: 31 डिसेंबर आणि नववर्षाचे स्वागत म्हटले की पार्ट्यांचा बेत, फूल ऑन सेलिब्रेशन, मनोरंजन आदींची जणू फॅशनच झाली आहे. मात्र या दिवशी आयुष्याला कलाटणी देणा-या घटना घडत असतात. याकरिता पनवेलमधील सुकापुरात राकेश चंद्रकांत केणी(वय 26)या तरुणाने एक संदेशात्मक देखावा उभारला आहे. पनवेल परिसरात हा देखावा सध्याच्या घडीला चर्चेचा विषय ठरला आहे.

या देखाव्यात 31 सेलिब्रेशनच्या निमित्ताने मद्यपान केल्याने अनेक अपघात घडत असतात. यावेळी वाहन चालक मद्यपान करून आपल्याच अपघाताला निमंत्रण देत असतो. याकरिता या तरुणाने आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत अनोखा संदेशात्मक देखावा उभारला आहे .यामध्ये दारू पिऊन वाहने चालवू नका, महिलांवरील अत्याचार थांबवा, द दारूचा नव्हे.. द दुधाचा आदींसह झाडे लावा, झाडे जगावा आदी संदेश देणारी फलकं या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत. हा देखावा उभारताना अपघातग्रस्त कार देखील याठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचे देखावे पोलीस ठिकठिकाणी उभारून नागरिकांना सतर्क करत असतात. मात्र तरुण वयात एकीकडे तरुणमध्ये पार्ट्यांचे बेत शिजत असताना राकेश चंद्रकात केणी या तरुणाने उभारलेला देखावा खरोखरच कौतुकास्पद आहे.दरवर्षी नावीन्यपूर्ण देखावे दरवर्षी राकेश केणी आपले वडील चंद्रकांत केणी यांच्या सहकार्याने नावीन्यपूर्ण देखावे उभारत असतात. पोलिसांमार्फत 31 डिसेंबर निमित्ताने सर्वत्र जनजागृती केली जात असते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राकेश केणी अनोखा देखावा उभारत असतो. हा संदेशात्मक देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी सुकापूर येथे पाहावयास मिळत आहे.