शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोनेरी दिवस आले अन् हळद हसली! बाजारभाव तेजीत, शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा

By नामदेव मोरे | Updated: March 4, 2024 07:19 IST

मिरची, जिरे, वेलचीसह बहुतांश सर्व मसाल्याच्या पदार्थांचे दर मागील वर्षी तेजीत होते. काही वस्तूंचे दर पाच पट वाढले होते; परंतु हळदीला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले.

नवी मुंबई : या वर्षी देशभर हळदीला चांगला भाव मिळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई बाजार समितीमध्येही हळद १५० ते २०० रुपये किलो दराने विकली जात असून, यामध्ये अजून वृद्धी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

मिरची, जिरे, वेलचीसह बहुतांश सर्व मसाल्याच्या पदार्थांचे दर मागील वर्षी तेजीत होते. काही वस्तूंचे दर पाच पट वाढले होते; परंतु हळदीला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले.

गतवर्षी मुंबई बाजार समितीमध्ये हळद प्रतिकिलो ९० ते १३० रुपये किलो दराने विकली जात होती. यावर्षी हेच दर १५० ते २०० रुपये किलोवर पोहोचले आहेत. यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. बाजार समितीमध्ये प्रतिदिन ३० ते ५० टन हळदीची विक्री होत आहे. 

औषधी गुणधर्महळदीमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे ग्राहकांकडून आहारामध्येही हळदीला नेहमी प्राधान्य दिले जाते. औषध, सौंदर्य प्रसाधनामध्ये, धार्मिक कार्यक्रम व लग्नकार्यातही हळदीचा वापर होत असतो.

९० ते १३० रुपये किलो दर गतवर्षी १५० ते २०० रुपये किलो दर यावर्षी 

गतवर्षी हळदीचे दर कमी होते. यावर्षी हळदीला समाधानकारक भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. - अमरीश बरोत, व्यापारी मसाला मार्केट 

यासाठी हळकुंडांना मागणीउन्हाळ्यामध्ये लग्नसराई, चटणी तयार करणे यासाठी हळद व हळकुंडांना मागणी वाढते. यामुळे पुढील दोन महिने हळदीचे दर तेजीत राहण्याचा अंदाज व्यक्त केला  जात आहे. मुंबई बाहेरील बाजारपेठांमध्येही हळदीला चांगला दर मिळत असल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

तामिळनाडूसह महाराष्ट्र आघाडीवरदेशात तामिळनाडू व महाराष्ट्रात हळदीचे सर्वाधिक उत्पादन होते. तेलंगणा, कर्नाटकमध्येही मोठ्या प्रमाणात हळद लागवड केली जाते. महाराष्ट्रात सातारा, सांगली, हिंगोली परिसरात हळदीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

सर्वाधिक उत्पादन भारतातजगातील सर्वांत जास्त हळदीचे उत्पादन भारतामध्ये होते. २०२२-२३ मध्ये ३.२४ लाख हेक्टरवर हळद लागवड केली होती. ११.६१ लाख टन हळदीचे उत्पादन झाले होते. जगातील उत्पादनापैकी ७५ ते ८० टक्के उत्पादन फक्त भारतामध्ये  होते. युएई, युएसए, मलेशिया, बांगलादेश व इतर देशात निर्यात केली जाते.  देशात ३० पेक्षा जास्त जातीच्या हळदीची लागवड केली जाते. 

टॅग्स :FarmerशेतकरीMarketबाजार