शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

दिघ्यातील पदपथ बनले गोडाऊन, कारवाईकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 12:32 AM

शहरातील अतिक्रमणांवर नियंत्रण मिळवण्यात महापालिकेसह सिडको व एमआयडीसी प्रशासनही अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

नवी मुंबई : दिघा परिसरातील पदपथ अतिक्रमणांच्या विळख्यात जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पदपथांवर व्यावसायिकांचे साहित्य साठवले जात असल्याने पदपथांचे नुकसान होत असून, पादचाऱ्यांचीही गैरसोय होत आहे. यानंतरही अशा अतिक्रमणांवर पालिकेकडून कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याने अधिकाऱ्यांच्या भूमिकेविषयी संताप व्यक्त होत आहे.शहरातील अतिक्रमणांवर नियंत्रण मिळवण्यात महापालिकेसह सिडको व एमआयडीसी प्रशासनही अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रस्ते, पदपथ तसेच मोकळे भूखंड अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले जात आहेत, असे भूखंड लाटणाºया भूमाफियांच्या टोळ्या शहरात सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्याकडून मोकळ्या भूखंडावर झोपडी उभारून अथवा इतर प्रकारे अतिक्रमण करून ते हडपले जात आहेत. त्यात व्यावसायिकांचाही सहभाग दिसून येत आहे. व्यावसायिक जागेव्यतिरिक्त परिसरातील इतरही मोकळ्या जागांवर त्यांचे साहित्य मांडून त्या बळकावल्या जात आहेत. बळकावल्या जाणाºया जागांमध्ये पदपथांचाही समावेश दिसून येत आहे. व्यावसायिकांच्या छोट्या-मोठ्या साहित्यांसह टाकाऊ वस्तू पदपथांवर साठवल्या जात आहेत. हे साहित्य कित्येक महिने त्या ठिकाणी पडून राहत असल्याने शिवाय क्षमतेपेक्षा जास्त भार पडल्याने तिथले पदपथ खचत आहेत. यामुळे नागरिकांच्या सुविधांसाठी लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पदपथांचे नुकसान होत आहे. असाच प्रकार दिघा येथील गणपतीपाडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच त्या ठिकाणी आगीचीही घटना घडली होती. अगदी पेट्रोलपंपाला लागूनही अतिक्रमण केले जात आहे. त्यामुळे एखादी आगीची दुर्घटना घडल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात; परंतु अशा अतिक्रमणांवर कारवाईच्या बाबतीत संबंधित सर्वच प्रशासन निष्काळजीपणा करत असल्याचा संताप स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे एका व्यावसायिकाच्या अतिक्रमणाला मिळालेले अभय पाहून इतरही व्यावसायिक पदपथांवर अतिक्रमण करू लागले आहेत. वेळीच या परिस्थितीवर नियंत्रण न मिळवल्यास संपूर्ण परिसरातील मोकळ्या जागा व पदपथ अतिक्रमणाच्या विळख्यात जाण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई