शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीतील रस्त्यांना आले गोडाऊनचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:44 IST

रासायनिक साठ्यामुळे दुर्घटनेची शक्यता

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : प्रशासनाच्या अर्थपूर्ण हितसंबंधामुळे एमआयडीसीतल्या रस्त्यांचा गोडाऊन म्हणून वापर होताना दिसत आहे. संपूर्ण औद्योगिक पट्ट्यात जागोजागी हे चित्र पाहायला मिळत असून त्याठिकाणी ज्वलनशील रासायनिक पदार्थांचाही साठा असल्याचे समजते. यामुळे भविष्यात मोठ्या दुर्घटनेची शक्यता असतानाही त्याकडे डोळेझाक होत आहे.आशिया खंडातला मोठा औद्योगिक पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमआयडीसी परिसरातील अनेक मोठमोठ्या उद्योग, व्यवसायांना घरघर लागली आहे. विविध कारणांमुळे अनेकांनी आपले व्यवसाय इतरत्र हलवल्याने एमआयडीसी प्रशासनानेही तिथल्या सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. यातूनच काही उद्योजकांनी एमआयडीसी परिसरातले रस्ते, मोकळी मैदाने तसेच कंपनीच्या आवारातील शिल्लक जागा देखील गोडाऊन म्हणून वापराला सुरवात केली आहे, तर काहींनी आपला सातबारा दाखवून बºयाच ठिकाणी अनधिकृत व्यवसाय चालवले आहेत. त्यानुसार रस्त्यांवर तसेच मोकळ्या जागेत कंपन्यांचे साहित्य साठवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामध्ये ज्वलनशील पदार्थांसह इतर रासायनिक द्रवांचा समावेश आहे, तर काही ठिकाणी भंगाराचे साहित्य साठवण्यासाठी देखील रस्ते अडवण्यात आले आहेत. यामुळे कामगार वर्गासह इतर सर्वसामान्यांना अशा ठिकाणी गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्याठिकाणी आगीची घटना घडल्यास संपूर्ण परिसरात अग्नितांडव होवून मोठ्या जीवितहानीची शक्यता आहे. यानंतरही संबंधित सर्वच प्रशासनांची त्याकडे अर्थपूर्ण डोळेझाक होत असल्याचा आरोप शिरीष पाटील यांनी केला आहे.एमआयडीसी परिसरात भंगार माफियांचे मोठे रॅकेट सक्रिय असून त्यांना राजकीय वरदहस्त असल्याचे अनेक घटनांमधून समोर येत आहे. त्यात काही लोकप्रतिनिधींचाही समावेश असल्याची चर्चा आहे. त्यांच्याकडूनच एमआयडीसी परिसरातील मोकळ्या जागेवरील तसेच रस्त्यांवर उघडपणे बेकायदेशीररीत्या चालवल्या जाणाºया भंगाराच्या गोडाऊनला देखील वरदहस्त लाभत असल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीNavi Mumbaiनवी मुंबई