शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दोन पुस्तके द्या आणि आजीवन सभासद व्हा

By admin | Updated: November 24, 2015 01:46 IST

सदस्यत्वाचे पैसे नाहीत किंवा फी भरल्याची पावती नाही. वाचन संस्कृती जोपासण्याकरिता कुठलीही दोन पुस्तके द्या आणि वाचनालयाचे सदस्यत्व व्हा असा उपक्रम ब्रम्हांड कट्टा

भाग्यश्री प्रधान, ठाणेसदस्यत्वाचे पैसे नाहीत किंवा फी भरल्याची पावती नाही. वाचन संस्कृती जोपासण्याकरिता कुठलीही दोन पुस्तके द्या आणि वाचनालयाचे सदस्यत्व व्हा असा उपक्रम ब्रम्हांड कट्टा वाचनालयाकडून राबवला जात असून त्याला वाचकांचा, पुस्तकप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.सामान्यपणे कुठल्याही वाचनालयात पैसे भरून सदस्यत्व घेता येते. त्यामुळे महिन्याची वर्गणी, लेट फी, पुस्तक हरवल्यास दंड अशी रोखीच्या व्यवहारांची औपचारिकता येते. ब्रम्हांड कटट्यातंर्गत चालवण्यात येणाऱ्या वाचक कट्टा वाचनालयाचे सदस्यत्व घेण्यासाठी कुठलीही दोन पुस्तके देऊन आजीवन सदस्यत्व मिळवता येते. ही संकल्पना व्यंगचित्रकार विजयराज बोधनकर यांची आहे. ज्याला खरोखर पुस्तकांच्या वाचनाची गोडी आहे, ज्याच्याकडे पुस्तकांचा संग्रह करण्याची आवड आहे, जो पुस्तकांवर प्रेम करतो अशीच व्यक्ती या वाचनालयाची सदस्य होऊ शकते. केवळ शेजाऱ्याने लायब्ररी लावली म्हणून मी ही लावली या न्यायाने पुस्तके घरी नेऊन ठेवणाऱ्या व त्यावरील धूळ साफ करून ती परत आणून देणाऱ्या दिखाऊ वाचकांना त्यामुळे येथे प्रवेश करण्याची संधीच उपलब्ध होणार नाही. वाचनातून वाचन संस्कृती जोपासण्याकरिता हा प्रकल्प राबविण्यात आला असल्याचे कटट्यातर्फे सांगण्यात आले. हे वाचनालय ब्रम्हांड प्रवासी महासंघ, धर्माचा पाडा येथे असून महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी ५.३० ते ७.३० हे वाचनालय सदस्यांसाठी सुरू असते. तसेच १५-२० दिवस वाचनासाठी पुस्तके घरी दिली जातात. या वाचनालयाला दाजी पणशीकर, रोटरी क्लब मिड टाऊन, ठाणे जिल्हा केबल सेनेचे अध्यक्ष मंगेश वाळंज यांनी या वाचनालयाला बुकशेल्फही भेट दिले आहे. या वाचक कट्ट्याला उत्स्फूर्र्त प्रतिसाद मिळत आहे.या वाचनालायचे व्यवस्थापन सुमित लोखंडे आणि अनिल अस्वले हे करत असून ब्राम्हांड कटट्याचे अध्यक्ष राजेश जाधव यांनी यासाठी हातभार लावल्याचे वाचनालय समितीतर्फे सांगण्यात आले. या वाचनालयात १०० सभासद असून जास्तीत जास्त तरूणांनी पुस्तके देऊन वाचनसंस्कृती वृद्धींगत करावी, असे आवाहनही संस्थेतर्फे करण्यात आले.