शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई दहावीच्या निकालात मुलींची बाजी, दोन विद्यार्थिनींना मिळाले ९९ टक्के गुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 02:26 IST

सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या निकालात दोन विद्यार्थिनींनी ९९ टक्के गुण मिळवले आहेत, तर अनेक शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

नवी मुंबई : सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या निकालात दोन विद्यार्थिनींनी ९९ टक्के गुण मिळवले आहेत, तर अनेक शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. कोणत्याही प्रकारे अभ्यासाचा ताण न घेता केवळ अभ्यासात सातत्य राखून हे यश मिळवल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.सोमवारी लागलेल्या सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या निकालात कोपरखैरणेतील रिलायन्स फाउंडेशन स्कूलच्या धात्री मेहता व नेरुळच्या एपीजे स्कूलच्या दीपसमा पांडा या दोघींनी ९९ टक्के गुण मिळाले आहेत. त्यांना ५०० पैकी ४९७ गुण मिळाले आहेत. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. दीपसमा पांडा हिने अभ्यासाकरिता स्वत:चे वेळापत्रक तयार केले होते. त्यानुसार स्वत:चे इतर छंद जोपासत वेळापत्रकानुसार नियमित ती अभ्यास करायची. तर धात्री मेहता हिने कोणताही खासगी क्लास न लावता ९९ टक्के गुण मिळवले आहेत.नियमित घरीच अभ्यास करण्यासह सराव पत्रिका सोडवणे यावर ती भर द्यायची. अभ्यासात एकाग्रता लागावी यासाठी ती मेडिटेशन देखील करायची. त्यामुळे आपल्याला तणावमुक्त अभ्यासाला मदत झाली असून, इतर विद्यार्थ्यांनीही ताण न घेता अभ्यास करण्याचा सल्ला दोघींनीही दिला आहे. त्याचप्रमाणे नेरुळच्या एमजीएम शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यामध्ये प्रिया मडके हिला ९७ टक्के, नक्षत्रा तरडे हिला ९६ टक्के, प्रसाद इथापे याला ९५ टक्के, अनिता मौर्या हिला ९४ टक्के, श्रीराज घाडगेला ९२ टक्के, तरुन्नम फाकराला ९२ तर पलक तिवारीला ९१ टक्के गुण मिळाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांसह पालकांकडून कौतुक केले.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र