नवी मुंबई : अल्पवयीन मुलीस अमली पदार्थाचे व्यसन लावून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार नेरूळमध्ये घडला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून, त्यामध्ये एका युवतीचाही समावेश आहे. त्यांच्यावर बलात्कार व पिटाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अटक केलेल्या आरोपींमध्ये जस्टीन जेकब थनराज, नितेश मुरलीधर वामन व 34वर्षीय तरुणीचा समावेश आहे. हे तिघे जण नेरूळमधील एका खाजगी क्लासेसच्या बाहेर उभे राहत असत. क्लासमध्ये दहावीच्या शिकवणीसाठी येणा:या मुलीशी या तिघांची मैत्री झाली. तिघांनी तिला प्रथम सिगारेट पिण्याची सवय लावली व नंतर गांजा व चरस देण्यास सुरुवात केली. मुलगी नशेच्या आहारी गेल्यानंतर तिला अमली पदार्थ पुरविण्यासाठी वारंवार पैशांची मागणी केली जाऊ लागली. सप्टेंबर 2क्12मध्ये सदर मुलगी 11वीमध्ये शिक्षण घेत असताना तिघांनी तिला ब्राऊन शुगरचा जादा डोस दिला व पैशांची मागणी सुरू केली. पैसे मिळत नसल्याने त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली व शिरवणोमधील एका लॉजवर नेऊन तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. जस्टीन व नितेशनेही तिच्यावर अतिप्रसंग केला. यानंतर अनेक वेळा तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. 2क्12मध्येही तिला ड्रग्जचा जादा डोस व नशेचे इंजेक्शन देऊन जस्टीनच्या घरी डांबून ठेवले व तिच्या वडिलांकडून 7क् हजार रुपये आणून देण्याची मागणी केली व नितेशबरोबर लग्न करण्याची बळजबरी सुरू केली.
पीडित मुलीने वडिलांना झालेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी इज्जत व भीतीमुळे कोणालाही घटना सांगितली नाही. सदर मुलीने अभ्यासावर लक्ष दिले व बारावी उत्तीर्ण झाली. तिने बीएमएससाठी प्रवेश घेतला आहे. या तिघांनी पुन्हा तिच्याशी संपर्क सुरू केला. तिच्याकडून 65 हजार रुपये वसूल केले आहेत. 3 ऑक्टोबरला पुन्हा जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे वडिलांनी नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलिसांनी पिटा कायद्याअंतर्गत व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आयुक्त के.एल. प्रसाद, उपआयुक्त शहाजी उमाप, सहायक आयुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नेरूळच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता अल्फान्सो व त्यांच्या टीमने या गुन्ह्याचा सखोल तपास करून तीनही आरोपींना अटक केली. (प्रतिनिधी)
पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे. तिघेही बेरोजगार असून अमली पदार्थाच्या आहारी गेले आहेत. पोलिसांना आरोपींकडे थोडेसे अमली पदार्थ सापडले असून, मुलीकडे इंजेक्शनही सापडली आहेत. आरोपींना अमली पदार्थ पुरविणा:या ठिकाणी धाडी टाकल्या होत्या; परंतु तेथे काहीही सापडले नसल्याची माहिती उपआयुक्त शहाजी उमाप यांनी दिली.